Amshya Padvi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amshya Padvi News: ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला; आमश्या पाडवी शिंदे गटात..

Nandurbar Lok Sabha Constituency 2024: सामान्य आदिवासी कार्यकर्ता असलेल्या पाडवी यांना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर नियुक्ती केली होती. आज ते शिंदे गटात प्रवेश करीत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena Nandurbar Politics: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अक्कलकुवा तालुक्यात (Nandurbar Lok Sabha Constituency 2024) मोठा धक्का बसला. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी (MLA Amshya Padvi) आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. आमदार पाडवी यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी शिंदे गटात (eknath shinde) जाण्याचे संकेत दिले होते. पाडवी गेले अनेक दिवस शिंदे गटाच्या संपर्कात होते.

आमदार पाडवी शिंदे गटात प्रवेश करणार याची कुणकुण स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच लागली होती. त्यामुळे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी सावध होते. पाडवी आज सायंकाळी मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सायंकाळी बैठक बोलाविली आहे. अक्कलकुवा वगळता अन्य भागातील कोणीही शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात जाणार नसल्याचे या नेत्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून आमदार पाडवी यांना उमेदवारी हवी होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. येथून माजी मंत्री के.सी.पाडवी उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पाडवी यांनी केलेली मागणी मान्य होण्यासारखी नव्हती.

आज सकाळी अक्कलकुवा येथून ७० गाड्या आणि कार्यकर्त्यांसह आमदार पाडवी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासमवेत प्रामुख्याने अक्कलकुवा भागातील पदाधिकारी होते. नंदुरबार या आदिवासी भागातील एक सामान्य आदिवासी कार्यकर्ता असलेल्या पाडवी यांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र पाडवी यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाला विरोध केला होता. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हा प्रवेश देऊ नये अशी मागणी केली होती. पाडवी हे स्थानिक राजकारणात फारसे चर्चेत नसलेले नाव आहे. त्याचा पक्षाला फटका बसू शकतो असा इशारा दिल्याचे कळते.

याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी संख्याबळाचा प्रश्न म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी आमश्या पाडवी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो, असे 'सरकारनामा' ला सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT