Solapur News: कोविडची लस घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते, त्यांनाही देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाला, मोदी सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकाना जबरदस्ती केली.
मोदींचा फोटो असताना मी कशासाठी कोरोना लस घेऊ? असा अजब दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या (Solapur Lok Sabha Constituency 2024) पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात गावकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
"तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी मोदी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतले. तुम्हाला लस देण्यासाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे. ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही आजार सुरु झाले. मी तर व्हॅक्सिन घेतलेचं नाही. मोदींचा फोटो असताना मी कशासाठी व्हॅक्सिन घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते," असे प्रणिती म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आपल्याला ज्या कंपनीचे जबरदस्तीने व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला ज्या कंपनीचे जबरदस्तीने व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला मारण्यासाठी, टेन्शन नका घेऊ, पण आपल्याला व्हॅक्सिन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं," असे प्रणिती म्हणाल्या.
प्रणिती शिंदे म्हणाल्या,"सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले," गेल्या काही दिवसापासून प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जातील, अशा चर्चा सुरु आहेत.त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहेत.
सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले असून तीन-चार दिवसांत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते. तर भाजपनेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली असून दोन-तीन दिवसांत भाजपचाही उमेदवार अंतिम होणार आहे.सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच त्यांचे नाव जाहीर होणार आहे. तर भाजपनेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली आहे. भाजपकडून काही नावांवर चाचपणी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.