Alcohol Ban Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shahada Asalod Liquor Ban : महिलांनी करुन दाखवलं; बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात दारुची बाटली अखेर 'आडवी'

Asalod Liquor Ban Fight Success Women Vote in favor of alcohol ban: असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामहिलांनी लढा उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर रविवारी गावात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान झाले.

Mangesh Mahale

Nandurbar News: शहादा तालुक्यातील असलोद येथे दारूबंदीसाठी रविवारी महिलांचे मतदान झाले. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.

गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात 677 पैकी 612 महिलांनी दारुबंदीसाठी कौल दिल्याने आता या गावात दारुबंदी होणार हे स्पष्ट झाले आहे.

शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर रविवारी गावात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान केले.

सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आले.

गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो, दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे. आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले आहेत.

त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती, अखेर प्रशासनाने आमची मागणी मंजूर केली. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, असे येथील महिलांनी सांगितले.

एकूण 1216 पैकी 677 महिलांनी मतदान केले. त्यापैकी 612 महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारुबंदीच्या बाजूने मतदान केलं. तर 49 महिलांनी उभी बाटली म्हणजे दारुबंदीच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर मतमोजणीमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाल्याचं स्पष्ट झालं. दारुबंदीच्या बाजूनं महिलांनी कौल दिल्यानं गावकऱ्यानी एकच जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

एकूण झालेले मतदान 677

आडवी बाटली 612

उभी बाटली 49

बाद मते 16

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT