Narhari Zirwal News: कर्जमाफीचा प्रश्न महायुती सरकारच्या गळ्याचा फास बनू लागला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला होत आहे. विशेषत: नाशिकचे शेतकरी याबाबत हट्टाला पेटले आहेत.
कर्जमाफीच्या प्रश्नावर विधानसभेच्या सभांमधून अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवल्या. सत्ता आल्यावर मात्र महायुती सरकारची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे कर्जमाफी होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगून टाकले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या या घोषणेवर विरोधकांना टीका करण्याची मोठी संधी मिळाली. शेतकरी संघटना देखील या प्रश्नांवर आक्रमक होत इशारे देत आहेत. यासंदर्भात सुरुवातीला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची कोंडी झाली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक संकटात सापडली आहे. त्यावर राज्य सरकारने मदत करावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. कृषिमंत्री कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र त्यात कर्जमाफी नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना या विषयावर एकत्र आल्या आहेत. त्यामुळे विविध मंत्र्यांसमवेत कर्जमाफीच्या प्रश्नावर बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र यातील एकाही बैठकीच्या निष्कर्ष बाबत शेतकरी संघटनांचे समाधान होत नाही.
आता अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांना शेतकऱ्यांनी चांगलेच त्रस्त केले आहे. कर्जमाफी होऊ शकत नाही. त्यामुळे व्याजमाफी करावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीतही राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी व्याज वसुलीबाबत ठाम राहू नये असे सांगितले होते.
शेतकरी संघटनांच्या या जिल्हा बँकेची मात्र कोंडी झाली आहे. २२०० कोटींच्या थकबाकीवर व्याज न घेतल्यास बँक संकटात येणार आहे. थकबाकी वर व्याज घेतले नाही तरी ठेवींवर मात्र व्याज द्यावे लागणार आहे. हा आर्थिक मेळ कसा बसवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळेच कर्जमाफीच्या प्रश्नावरून प्रारंभी उपमुख्यमंत्री पवार अडचणीत आले होते. नंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे टिकेचे लक्ष झाले. त्यावर सर्व करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा विषय पूर्णपणे सोडलेला नाही, असे सांगत चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. आता मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.