gokul zirwal narhari zirwal (1).jpg sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Narhari Zirwal : मुलगा गोकुळ पवारसाहेबांच्या पक्षातून लढण्याची चर्चा, अखेर झिरवाळांनी थेटच सांगितलं; म्हणाले...

Narhari Zirwal On Gokul Zirwal : गोकुळ अज्ञाधारक आहे. मी जनतेचा अज्ञाधारक आहे. मग, गोकुळ मला डावलून कसा जाईल? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित केला.

Akshay Sabale

विधानसभेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते, नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे राष्ट्रवादीच्या ( शरदचंद्र पवार ) 'निष्ठावान' कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसले होते.

दिंडोरी मतदार संघातून उमेदवारी मिळाली, तर लढण्यास तयार असल्याचं म्हणत गोकुळ झिरवाळ यांनी वडील नरहरी झिरवाळ यांच्याविरूद्ध दंड थोपटले होते. पण, पुत्राच्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही," असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

"मी गोकुळचा बाप आहे. मला बाप नव्हता, पण जमिनीवर राहून मी जनतेची मने जिंकली, त्यानं जनता प्रवृत्त झाली. गोकुळनं सुद्धा हे काम करावं, असं त्याला समजून सांगितलं. गोकुळ आज्ञाधारक आहे. मी जनतेचा आज्ञाधारक आहे. मग, गोकुळ मला डावलून कसा जाईल?" असं झिरवाळ म्हणाले.

"गोकुळचा बापच हुशार आहे. मग, थोडा जास्त हुशार गोकुळ असणारच ना... सांगायचं एकीकडे जायचं दुसरीकडे तशातले आम्ही आहोत. गद्दारीचा शिक्का माझ्यावर कधी लागलाच नाही," असं स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.

गोकुळ यांची समजूत घालणार का? या प्रश्नावर नरहरी झिरवाळ म्हणाले, "ती चिंता तुम्ही करण्याची गरज नाही. गोकुळ माझा पोरगा आहे. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही."

गोकुळ झिरवाळांनी काय म्हटलं होते?

"माझ्या राजकारणाची सुरूवात शरद पवारसाहेबांकडे ( Sharad Pawar ) बघून झाली आहे. पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय. मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होते. मी महाविकास आघाडीत आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. माझी छाती फाडली, तर पवारसाहेबच दिसतील. विधानसभेची निवडणूक लढण्यास मी उच्छुक आहे. वडिलांविरोधात लढण्याची माझी इच्छा आहे. पक्षानं जबाबदारी दिली, तर मी लढणार," असा निर्धार गोकुळ झिरवाळ यांनी व्यक्त केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT