Raj Thackeray on Sharad Pawar : पवारसाहेब, महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हातभार लावू नका! ठाकरे असे का म्हणाले?

Raj thackeray on Sharad Pawar : अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही असंच घडले की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रतिक्रिया आली आहे.
raj thackeray, sharad pawar
raj thackeray, sharad pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबई येथे केलेलं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याच पद्धतीचा हिंसाचार आजूबाजूच्या राज्यात देखील घडल्याचा पाहायला मिळाल अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही असंच घडले की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रतिक्रिया आली आहे.

पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार यांचे स्टेटमेंट मी एकलं नाही, पण पवार साहेबांनी महाराष्ट्राचा मणिपूर करायला हातभार लावू नये असा खोचक टोला लगावला.

raj thackeray, sharad pawar
Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

महाराष्ट्रात (Maharashtra) जे काही आता चालू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मन दूषित केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्ष नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे तुमच्यातले मतभेद बाजूला ठेवून जातीपातीत विष कालवून जर मत मिळणार असेल तर महाराष्ट्राचे भविष्य काही चांगलं नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

raj thackeray, sharad pawar
Raj Thackeray : झेंड्यापासून दांड्यापर्यंत महायुतीचा प्रचार केला, पण.. मनसे कार्यकर्त्यांची खंत !

पुणे शहरातील पूर परिस्थिती बाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, शहरामध्ये टाऊन प्लॅनिंग अजिबात झालेलं नाही अचानक पाणी सोडल्याने अनेकांच्या संसार उध्वस्त झाले आहेत. याला सर्वस्वी प्रशासन राज्य सरकार जबाबदार आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना स्वतः लक्ष घालावे लागणार आहे. नागरिकांशी चर्चा करून यावरती तोडगा करणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com