Maratha Reservation Protest in Nashik : जिल्ह्यात मराठा समाजाचे सात आमदार आहेत. यातील बहुतांश आमदार आरक्षणाच्या प्रश्नावर फारसे व्यक्त झालेले नाहीत. मात्र, हे आंदोलन पेटल्यावर आता आमदारांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. (Maratha MLAs may come on the target of Maratha community)
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि सुहास कांदे (Suhas Kande) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा देत या मागणीसाठी (Nashik) आपली राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जालना) येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते. त्यावर लाठीहल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. तेव्हापासून नाशिक येथेदेखील उपोषण व आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर मराठा आरक्षण आंदोलनावर मराठा समाजाच्या आमदारांनी फारसे मत व्यक्त केले नव्हते.
सध्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन अतिशय संवेदनशील वळणावर पोहोचले आहे. गावोगावी राजकीय नेते, आमदारांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. आता राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या एकाही आमदाराने राजीनाम्याची तयारी दाखवलेली नव्हती. आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची धग वाढत आहे. यासंदर्भात काल नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आपले विविध कार्यक्रम रद्द करीत, राजीनामा देण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीदेखील दिंडोरीत आंदोलनादरम्यान त्यांना घेराव घालण्यात आला. त्यावर झिरवाळ यांनीही आपण आरक्षण मिळावे, यासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या राजकीय वाऱ्याची दिशा ओळख अनेक आमदारांना घाम फुटला आहे. आमदार सरोज अहिरे यांनीदेखील आपल्या कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर सकल मराठा समाजाचे समाधान होताना दिसत नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.