Maratha Andolan : 'चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष'

Ban in Akola : अकोला जिल्ह्यातही पडली नेत्यांना गावबंदीची ठिणगी
Maratha Protest in Charangaon
Maratha Protest in CharangaonSarkarnam
Published on
Updated on

Akola District News : मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस वाढतच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलक राजकीय नेत्यांचा रस्ता रोकत असल्याने सर्वपक्षीय पुढाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे. नेत्यांना गावबंदीचे लोण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानंतर ही ठिणगी आता अकोला जिल्ह्यातही पडलीय.

‘चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष..’ अशा आशयाचे फलक लावत अकोला जिल्ह्यातही नेत्यांना गावबंदी करण्यास प्रारंभ झाला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पातूर तालुक्यातील चरणगावमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाकारला आहे. तसे फलकही गावभरात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांना गावबंदी करणारे चरणगाव पहिले गाव ठरले आहे. (After Marathwada, Akola district also sparked village ban to the leaders for Maratha reservation in Maharashtra)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी राज्यभरात सध्या आंदोलन सुरू आहे. आरक्षणाचा निर्णय होत नसल्यानं मराठा आंदोलक आक्रमक होत आहेत. पुढाऱ्यांबाबत मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. त्यातच शनिवारी (ता. २८) विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर एसटी महामंडळाची बस जाळण्यात आली. मराठा आंदोलकांनी हे कृत्य केल्याचा आरोप होतो आहे. मात्र पोलिसांना यासंदर्भात अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. आता अकोला जिल्ह्यातही मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यास गावात प्रवेश मिळणार नाही, असे ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून त्यांना ग्रामस्थांनी पाठिंबाही जाहीर केलाय. ग्रामस्थांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येत ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. सरकारच्या भूमिकेनुसार गावातील मराठा समाज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहे.

बावनकुळेंना बसली होती झळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांचा ताफा अडवत बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. अकोल्यापासून जवळच असलेल्या पारसजवळ हा प्रकार घडला होता. गोपाल पोहरे यांच्यासह काही मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने मराठा समाज अकोला जिल्ह्यात आक्रमक होताना दिसत आहे.

जिल्हा प्रशासन सतर्क

राज्यभरात सध्या मराठा आंदोलन चांगलेच पेटले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात त्याचा मोठा भडका उडाला आहे. आता विदर्भातही आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाल्याने अकोला जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे. जिल्ह्यात आणखी कुठे आंदोलन होण्याची शक्यता आहे काय, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा सक्रिय केली आहे.

असं आहे चरणगाव

पातूर तालुक्यातील चरणगाव हे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्राबल्य असलेले गाव आहे. गावात जवळपास ५० टक्के मराठा बांधव आहेत. चरणगाव बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आणि मराठा समाजाचे आमदार नितीन देशमुख हे आमदार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधातही येथील मराठा समाजाने आंदोलन केले होते.

(Edited by : Prasannaa Jakate)

Maratha Protest in Charangaon
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचालींना वेग; उपसमितीची मंत्रालयात होणार बैठक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com