Celebration of Youths
Celebration of Youths Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकचे २५ युवक एकाचवेळी फौजदार झाले!

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) २०१९ परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला आहे. या परीक्षेतील यशस्‍वी परीक्षार्थींच्‍या अंतिम यादीत नाशिकच्‍या (Nashik) उमेदवारांचा समावेश आहे. पंचवीसहून अधिक उमेदवारांनी यश मिळविताना फौजदार होण्याचा मान मिळविला आहे.

राज्यभरातील एकूण ४९४ उमेदवारांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड जाहीर केलेली आहे. नाशिकमधील युवकांनीही या परीक्षेत यशस्‍वी कामगिरी नोंदविली आहे. संयुक्‍त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मैदानी परीक्षा-शारीरीक चाचणी व मुलाखत या माध्यमातून अंतिम निवड करण्यात आलेली आहे.

निकालानंतर जल्‍लोष

काही दिवसांपूर्वीच आयोगातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केलेली होती. त्‍यामुळे यादीत स्‍थान मिळविलेल्‍या उमेदवारांनी सुटकेचा श्‍वास सोडला होता. परंतु अंतिम निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. अशात शुक्रवारी निकाल जाहीर होताच शहर परिसरात जल्‍लोष बघायला मिळाला. अभ्यासिका प्रांगणात व मैदानावर यशस्‍वी उमेदवारांवर गुलालाची उधळण करत व खाद्यांवर घेत अन्‍य उमेदवारांनी आनंदोत्‍सव साजरा केला.

नाशिकचे यशस्‍वी उमेदवार असे

नाशिकमधून नारायण सानप, रावसाहेब खैरनार, संग्राम अहिरे, रोशन देवरे, कुणाल दिघावकर, किरण परबत, निशांत अहिरे, किरण देवरे, प्रदीप बोरसे, स्वप्नील पाटील, संकेत सानप, नवनाथ कांगणे, संतोष कडाळे, सूर्यभान घोलप, दीपक पाटील, यांनी यश मिळविले आहे. मुलींमध्ये सोनाली पवार, करिष्मा सोनवणे, काजल पानसरे, ज्योती नेहे, चंचल पवार, सृष्टी भामरे यांनी यशस्‍वी कामगिरी नोंदविली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT