Police investigation begins in Nashik over missing files linked to the 62-acre government land scam. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Land Scam : धक्कादायक! 62 एकर जमिनीचा घोटाळा, बिल्डर-राजकीय नेते अन् शासकीय अधिकाऱ्यांची अभद्र युती? तब्बल एक हजार कोटी...

Revenue Scam Nashik : तब्बल एक हजार कोटी रुपयांचा जमिनीचा घोटाळ्याची फाईल्स गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sampat Devgire

Nashik Land scam : बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेता आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमधून तब्बल एक हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती इमारत बांधण्याचे प्रस्तावित असलेला भूखंड गिळंकृत करण्याचा हा अयशस्वी प्रकार होता.

यामध्ये एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने राजकीय नेत्यांचा वापर करीत पडद्यामागून सूत्रे हालविल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली एक हजार कोटींची 62 एकर जमीन चर्चेत आली आहे.

नाशिक शिवारातील भूमापन क्रमांक 750 751 आणि 775 ही सुमारे 62 एकर जमीन आहे. ही जमीन कुळ कायद्याचा गैरवापर करून एका बांधकाम व्यवसायिकाने खरेदी केली. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा आहे.या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर स्थानिक, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. तर या सर्व न्यायालयांमध्ये बांधकाम व्यवसायिकाची मागणी फेटाळण्यात आली. खटले देखील निकालात काढण्यात आले.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी संबंधित जमिनीचा व्यवहार बेकायदा ठरवला होता. या जमिनीवर शासनाचे नाव लावण्यात आले. तिचा ताबाही जिल्हा महसूल विभागाकडे आला. मात्र आता माहितीच्या अधिकारात संबंधित सोन्यापेक्षाही अधिक किंमत असलेल्या या जमिनीची फाईल गहाळ झाल्याचे उघड झाले आहे.

गुन्हा दाखल

संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून ही फाईल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली होती. तेथून ती परत आली नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिला. त्यावरून आता थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यवसायिकांच्या इस्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ही जमीन आपली असल्याचा दावा केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी या जमिनीची माहिती मागितली होती. 2018 मध्ये त्याबाबत फाईल सापडत नसल्याचे उत्तर दिले होते.

पोलिसांकडून तपास सुरू

यामध्ये हजारो कोटींची ही जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्यासाठी सत्ताधारी नेते आणि महसूल विभागातील अधिकारी कार्यरत असल्याचा संशय आहे. आता याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने फाईल नेमकी कोणी गहाळ केली? त्यामागे काय उद्देश होता? याचा तपास सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT