Municipal worker Death : राजकारण्यांच्या चमकोगिरीने घेतला महापालिका कर्मचाऱ्याचा बळी, अनधिकृत होर्डिंग काढताना मोठा अपघात

Chhatrapati Sambhajinagar hoarding accident : महापौरांसह आयुक्तांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासोबतच 1 कोटी 15 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. शहरात सर्वत्र बेकायदा होर्डिंगचे पेव फुटले आहे.
Municipal workers remove an illegal hoarding in Chhatrapati Sambhajinagar during a civic enforcement drive, highlighting rising concerns over electrical safety and unauthorized banners.
Municipal workers remove an illegal hoarding in Chhatrapati Sambhajinagar during a civic enforcement drive, highlighting rising concerns over electrical safety and unauthorized banners.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambahajinagar News, 22 Feb : नेत्यांची चमकोगिरी करणारी पोस्टरबाजी शहराचे विद्रुपीकरण तर वाढवतेच, पण नागरिकांनाही या राजकारण्यांची तोंड पाहण्याची अजिबात इच्छा नसते. राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात राजकारण्याच्या चमकोगिरीमुळे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरालीत मुकुंदवाडीत मंदिरावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग काढताना हायटेन्शन तारेला स्पर्श होऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता.21) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यावेळी आणखी एक कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कुटुंबीयांसह नातेवाईक, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान, महापौरांसह आयुक्तांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासोबतच 1 कोटी 15 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. शहरात सर्वत्र बेकायदा होर्डिंगचे पेव फुटले आहे. महापौर समीर राजूरकर यांनी पदभार घेताच शहर बेकायदा होर्डिंगमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. प्रभाग सहा अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना बेकायदा होर्डिंग हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मुकुंदवाडी गावातील हनुमान मंदिरावर लावण्यात आलेले होर्डिंग काढण्याची कारवाई पथकामार्फत सुरू होती. यावेळी स्वच्छता निरीक्षक प्रमोद बनकर, जवान शिवशाम काळे यांच्या नेतृत्वाखाली अमोल दिनकर जाधव (वय 27, रा. मुकुंदवाडी, संजयनगर, गल्ली नंबर-पाच) यांनी मंदिरावर जाऊन होर्डिंग काढले.

Municipal workers remove an illegal hoarding in Chhatrapati Sambhajinagar during a civic enforcement drive, highlighting rising concerns over electrical safety and unauthorized banners.
Mahadev Munde Case : 'वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या जीवाला धोका...'; मुलाला मारहाण होताच महादेव मुंडेंच्या पत्नीची पोलिसांत धाव

त्यांना रवी रणधीर रिडलॉन (वय 38, रा. गांधीनगर) मदत करत होता. लोखंडी अँगल असलेल्या होर्डिंगचा यावेळी मंदिरावरून गेलेल्या हायटेन्शन तारेला स्पर्श झाला. कोणाला काही कळण्याच्या आत अमोल शॉक लागून कोसळला. होर्डिंग खाली घेण्यासाठी मदत करणारे रवी यांनादेखील शॉक लागला. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी मोठा जमाव जमला. त्यांनी दोघांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र अमोल याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमोलचे कुटुंबीय, नातेवाईकांनी धाव घेऊन एकच आक्रोश केला. माजी नगरसेवक, कामगार संघटनांचे कृष्णा बनकर, गौतम खरात, संजय रगडे, नगरसेवक अशोक हिवराळे, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, बाळूलाल गुजर, भारतीय दलित पॅंथरचे रमेश खंडागळे, वंचित बहुजन आघाडीचे सतीश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला. होर्डिंग हटविण्याचे स्वच्छता कर्मचाऱ्याचे काम नाही, असे असताना काम दिले कसे? असा प्रश्‍न करत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Municipal workers remove an illegal hoarding in Chhatrapati Sambhajinagar during a civic enforcement drive, highlighting rising concerns over electrical safety and unauthorized banners.
Dcc Bank Election : भाजपच्या धुरंधरांचे आता टार्गेट ‘डीसीसी’; पण सहकारमंत्र्यांकडील ‘ही’ दोन प्रकरणे ठरणार कळीची!

दोन तासांनंतर महापौर समीर राजूरकर, आयुक्त जी. श्रीकांत यांनी घाटीत धाव घेतली. मृत अमोल यांच्या कुटुंबीयांसह कामगार संघटनाच्या प्रतिनिधींसोबत दोघांनी चर्चा केली. प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासोबतच 1 कोटी 15 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याचे आश्‍वासन यावेळी दोघांनी दिले.

एकुलता एक मुलगा

अमोल जाधव सहा महिन्यांपूर्वीच आईच्या जागेवर महापालिकेत लाड समितीच्या शिफारशीनुसार रुजू झाले होते. त्यांच्यामागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. एक मुलगी सात महिन्यांची, दुसरी तीन वर्षांची आहे. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या अमोलचा अनधिकृत होर्डिंगमुळे बळी गेल्याने कुटुंबीयांना शोक अनावर झाला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com