Police escort accused Ashok Kharat in the Nashik fraud case involving fake accounts and financial scam worth over ₹57 lakh. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Scam : भोंदू खरातचं आणखी एक मोठं कांड उघडकीस; पोलिसांसह सर्वांनाच बसला धक्का

Ashok Kharat New Scam Exposed : नुकतंच महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात एसआयटीने खरातला 19 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अशातच आता या खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे.

Jagdish Patil

Nashik News, 21 Apr : नाशिकमधील भोंदू अशोक खरातला 17 मार्चला रात्री अकरा वाजता अटक केल्यापासून त्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण खरातने केवळ शेकडो महिलांचं लैंगिक शोषणच केलं नाही, तर त्याने अनेक भक्तांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे.

याबाबतची धक्कादायक माहिती पोलीस आणि एसआयटीच्या तपासातून उघडकीस येत आहे. नुकतंच महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात एसआयटीने खरातला 19 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अशातच आता या खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याचे कांड काही संपण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. खरातने सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावावर 32 बनावट खाती उघडून त्याने तब्बल 57 लाख 90 हजार 979 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

या प्रकरणी अशोक खरात आणि पतसंस्था व्यवस्थापनावर आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 2016 ते 2023 या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाला असून तक्रार दाराच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा वापर करून पतसंस्थेत तब्बल 32 बनावट खाती उघडण्यात आली होती. या खात्यांच्या माध्यमातून 57 लाखांहून अधिक पैशांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी अशोक खरातसह पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच ईडीने जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून मोठी चौकशी केली होती.

त्यानंतर लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता आणखी एका पतसंस्थेत बनावट खाती बनवल्याचं प्रकरण समोर आल्याने खरातचा पाय किती खोलात आहे याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT