Maharashtra political controversy : राजकीय नेत्यांचं भविष्य वर्तवणारा, तथाकथित ढोंगीबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यानंतर त्याचे सिन्नर (जि. नाशिक) इथल्या ईश्वानेश्वर मंदिराच्या विश्वस्तपदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर याचे नाव आल्याने, त्यांची राजकीय कारकीर्द वादात सापडली आहे.
रुपाली चाकणकर यांचे तथाकथित ढोंगीबाबा खरात याच्याबरोबर असलेल्या अध्यात्मिक संबंधांची आता चर्चा होऊ लागली आहे. तसंच फोटो देखील समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. यामुळे सावध झालेल्या चाकणकर यांचा खरात याने स्थापन केलेल्या ईशानेश्वर मंदिराच्या विश्वस्तपदावर रुपाली चाकणकर यांचे नाव असलेला फलक हटवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय नेते मंडळींचे हात बघून भविष्य सांगणाऱ्या नाशिकच्या (Nashik) अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या हातात, बलात्काराच्या गुन्ह्यात बेड्या पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय महिलेच्या आरोपावरून खरात विरोधात बलात्कार आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरात याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव याठिकाणी असणाऱ्या ईशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. याच ट्रस्टमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) विश्वस्त आहेत. पूर्वी मंदिर परिसरात विश्वस्त मंडळाचे असणारे बोर्ड आता मात्र हटवण्यात आला आहेत. अशोक खरात याने आपल्या राजकीय ओळखींचा फायदा घेत, नाशिकसह सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव आणि शिर्डी परिसरात देखील मोठी संपत्ती जमवल्याची सांगितलं जात आहे.
नाशिकमध्ये मधील स्वयंघोषित 'कॅप्टन' ज्योतिषी अशोक खरात, याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याशी संबंध अधोरेखित करत गंभीर आरोप केले.
खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकरांचे आवभगतकडे देखील लक्ष वेधलं. महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरूपयोग करत रूपाली चाकणकर यांनी, अशा लिंगपिसाटाला मदत केल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांच्या या गंभीर आरोपानंतर, ईशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा विश्वस्तपदाचं नावांचा, रुपाली चाकणकर यांचा नाव असलेला फलक हटवण्यात आला आहे. यावरून सुषमा अंधारे यांच्या आरोपांना धार चढल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.