Sushma Andhare Allegations Rupali Chakankar : राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?

Astrologer scandal with 58 videos political controversy: राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने खळबळ. सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत प्रतिक्रिया दिली. संपूर्ण बातमी वाचा.
Ashok Kharat, nashik Crime News
Ashok Kharat, nashik Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar Controversy Latest Update: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा ज्योतिषी अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा ज्योतिषी महाराष्ट्रातील काही मोठ्या राजकारण्यांचे भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्याकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.

हे प्रकरण समोर आल्यानंतर ज्योतिष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यामधील संबंध अधोरेखित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यात सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Ashok Kharat, nashik Crime News
Navy officer Crime : राजकारण्यांचे भविष्य सांगणारा 'हायप्रोफाईल ज्योतिषाला' बलात्कार प्रकरणी बेड्या; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; मर्चंट नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याचा काळा कारनामा

या पोस्ट मध्ये सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्कार आणि योन शोषण असे गंभीर आरोप आहेत.

खरात याच्या अटकेदरम्यान पोलिसांनी पेन ड्राईव्ह देखील हस्तगत केला असून त्यामध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या हाती लागले आहेत. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. त्यामध्ये केसरकर, तटकरे आणि चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची समावेश असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

अंधारे पुढे म्हणाल्या, अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Ashok Kharat, nashik Crime News
Sangli ZP President : सांगली ZP मध्ये भाजप अन् शिवसेनेकडूनही अध्यक्षपदासाठी अर्ज : सुहास बाबर यांचे 3 सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर

तसेच खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com