Viral photo controversy Maharashtra : नाशिकमधील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबा अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांबरोबर संबंध असल्याचे समोर येत आहे. तसे समाज माध्यमांवर फोटो व्हायरल होत आहे, यात भाजपचे अहिल्यानगरमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील फोटो आहे.
या संपर्कावरून विरोधकांनी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री विखे पाटलांविरोधात राजकीय टायमिंग साधलं आहे. या फोटोवरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवरून मंत्री विखे पाटलांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेला हा किस्सा सांगितला.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते शिर्डीला आले होते. मी पालकमंत्री होता. मतदारसंघात येणार म्हटल्यावर, मी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी शिर्डी निर्णय झाली की, अशोक खरात याच्या मंदिरात जायचं. दीपक केसरकर आमच्याबरोबर होते."
"या निर्णयानुसार आम्ही खरात याच्या मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं. तिथं खाली पूजा होत होती. तिथं आम्ही सर्व जण थांबलो. जिल्हाधिकारी होते. जिल्हा पोलिस (Police) प्रमुख होते. वाट पाहतो होतो. अर्धा-पाऊण तास त्याची पूजा सुरू होती. मुख्यमंत्री असल्याने, त्यांनी सांगितल्याने, त्यांच्याबरोबर जाणे माझे कर्तव्य होते," असे मंत्री विखे पाटील यांनी बाजू मांडली.
'परंतु खरातांशी निगडीत वेगवेगळे असे धक्कादायक असे संदर्भ आता समोर येत आहे. तसं पाहिलं गेल्यास, खरात आणि आमचा काही संबंध नाही. त्याच्या कर्तृत्वाविषयी बोलेल, पण आता नाही. कारण तो राजकीय सल्ले देखील द्यायचा. आता त्याला गजाआड केलं आहे. एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे,' याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधलं.
'आयपीएस तेजस्विनी सातपुते मॅडम विनंती आहे की, या प्रकरणात आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी. महिलांच्या अज्ञाताचा फायदा घेऊन, त्याने शोषण केलं आहे. त्यामुळे मुख्य आरोपीला शिक्षा होईल, अशी चकौशी व्हावी. सरकारने त्यावर आता कारवाई सुरू केली आहे,' असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हटले, "त्यावर भाष्य करणे उचित नाही. मात्र त्यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह आणि उचित आहे. संशयाच्या ढग त्यांच्याभोवती घोंगायला लागले होते. वास्तविक अगोदरच राजीनामा द्यायला हवा होता. त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा योग्यच आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.