Vikhe Patil Controversy : मंत्री विखेंचा फोटो अन् खरात कनेक्शन; सपकाळांचा राजकीय ‘टायमिंग’ गेम!

Congress leader Harshwardhan Sapkal shares a controversial photo of Minister Radhakrishna Vikhe Patil with accused godman Ashok Kharat from a Nashik temple, triggering political reactions : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री विखे पाटील यांचा भोंदूबाबा अशोक खरातच्या मंदिरात करत असलेल्या पुजेचा फोटो एक्सवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.
Vikhe Patil Controversy
Vikhe Patil ControversySarkarnama
Published on
Updated on

Congress attack BJP : बलात्काराच्या गुन्ह्यात पकडलेला नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या राजकीय संपर्काचे किस्से थांबायला तयारी नाही. खरात याच्या राजकीय संपर्कावरून, राज्यातील अनेक बडे नेते अडचणीत सापडले आहेत.

विशेष करून, सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. विरोधकांनी यावर टायमिंग साधत, सत्ताधाऱ्यांना चांगलच खिंडत गाठलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचे अहिल्यानगरमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे माध्यमांवर फोटो शेअर करत, साधलेल्या टायमिंगने खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या संस्थानमधील मंदिरात केलेल्या पुजेचा फोटो एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर मंत्री विखे पाटलांचा (Radhakrishna Vikhe Patil) फोटो पोस्ट करताना, महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विकृत बलात्कारी अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांविषयी माहिती होती, असं ते म्हणतात. पण मग त्यांना माहिती होती तर, ते त्याच्या संस्थानात असलेल्या मंदिरात पुजा करण्यासाठी गेलेच का? असा प्रश्न केला आहे.

Vikhe Patil Controversy
Ashok Kharat Fake Baba : अशोक खरातचे 'मोक्कार' कारनामे! नाशिक क्राइम ब्रांच झोपली होती का? परदेशी पळून जाण्याचा कट मुख्यमंत्र्यांनी उधळला; मंत्री विखेंचा दावा

की आजपर्यंत त्याच्या माध्यमातून सगळे फायदे उचलून आज काळे कारनामे बाहेर आल्यामुळे अगोदरच काढता पाय विखे पाटीलजी आपण घेत आहात का? असा खळबळजनक प्रश्न केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी साधलेल्या या टायमिंगमुळे मंत्री विखे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात.

Vikhe Patil Controversy
Ashok Kharat case: देवाभाऊ, एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? सुषमा अंधारे संतापल्या

मंत्री विखे पाटील यांच्याशेजारी एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर हे देखील दिसतात. सपकाळ यांनी समाज माध्यमांवर शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चांना तोंड फुटलं आहे. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी नाशिकच्या खरात प्रकरणावर शिर्डी इथं प्रतिक्रिया दिली आहे.

दलालकी अन् सर्व भानगडी बाहेर येतील....

माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे याची या प्रकरणात चौकशी होणार आहे, यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देता म्हटले की, "सर्व चौकशी होईल. एसआयटी स्थापन केली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या नेतृत्वात एसआयटी आहे. कोण दलाल होते, कोणी काय भानगडी केल्यात, सर्व बाहेर येईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com