Nashik News: राज्यभरातील अनेक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीवर दुष्काळाचे संकट आले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात वीज मंडळाने बागलाण तालुक्यातील ग्रस्त शेतकऱ्यांची वीज नाकाबंदी करण्याचे धोरण वीज मंडळाने हाती घेतले आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. वीजमंडळाच्या या धोरणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक जिल्ह्यतील बागलाण तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने पिके जळू लागली आहेत. अशातच पिकांना सिंचनाची गरज असताना वीज मंडळाने पुरवठा बंद केल्याने स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत.
वीज मंडळाच्या या पुरवठा धोरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी शेतकऱ्यांना घेऊन थेट वीज मंडळाच्या कार्यालयाला घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.
वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंता के. डी. बोरसे यांना घेराव घालत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी याबाबत पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असा इशारा दिला.
दुष्काळाच्या स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र तरीही शासन कोणतेही पावले उचलत नसल्याने शेतकरी आक्रमक होतील असे माजी आमदार चव्हाण म्हणाले.
नाशिकमधील बागलाण तालुक्यात दुष्काळाची स्थिती असल्याने शेतीला पाण्याची गरज आहे. दुसरीकडे गणेशोत्सव सुरू असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना उत्सवाच्या काळात अंधारात राहण्याची सक्ती वीज मंडळ निर्माण करीत आहे. यावर लवकर उपाय करण्याची मागणी चव्हाण यांंनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.