BJP AB form scam nomination impact 2026: नाशिकच्या भाजप एबी फॉर्म वाटपाच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागले आहेत. अधिकृत उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे हा वाद आता थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पोहोचला आहे.
नाशिक महापालिका निवडणूक भाजपच्या एबी फॉर्ममुळे गाजत आहे. माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निवडणुकीच्या आधीच मोठा वाद उफाळून आला आहे
शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात प्रवेश केला. अल्पावधीतच त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आपली मोहिनी टाकली आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये बडगुजर यांची असलेली चलती चर्चेचा विषय आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. वाटप करताना मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. त्यातून मोठा वाद देखील झाला.
एबी फॉर्म चे वाटप करताना काही अधिकृत उमेदवारांची कोंडी करण्यात आले. त्यामुळे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे शहाणे आणि बडगुजर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
या वादात आता आमदार सीमा हिरे यांनीही उडी घेतली आहे. नाशिक भाजप उमेदवारीच्या वादाच्या तक्रारी त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या तक्रारींची दखल घेऊन माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत आमदार हिरे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. उमेदवारांना एबी फॉर्म देताना काही यंत्रणा कार्यरत होत्या. त्यामुळे एकाच कुटुंबात दहा एबी फॉर्म पोहोचले असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. या आरोपाने एकच खळबळ उडाली
आमदार हिरे यांनी आपली खंत व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक एबी फॉर्म मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे. दुसरीकडे मात्र एकाच घरात पाच जणांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या हातात दहा ए बी फॉर्म असतात. हे कुणामुळे घडले? असा प्रश्न त्यांनी केला.
एबी फॉर्म आणि उमेदवारीचा वाद गंभीर आहे. याबाबत पक्षाने भविष्याचा विचार करून गंभीर दखल घेतली पाहिजे. कुणाचा कितीही बॅकअप असला तरी शेवटी जनतेचा बॅकअप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या तक्रारीचा पाठपुरावा झाला पाहिजे, असे आमदार हिरे म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून सुरू झालेला भाजप इच्छुकांचा हा वाद अद्यापही मिटेना. आता माघारीची मुदत संपल्यावरही तो मिटण्याची चिन्हे नाहीत. त्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर दिवसागणित दबाव वाढत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.