AB Form Controversy: मुकेश शहाणे थांबेनात; अर्ज बाद झाल्यावर शक्ती प्रदर्शन करीत दिला बडगुजर यांना इशारा!

Nashik BJP Mukesh Shahane’s Power Show After Nomination Rejection: एबी फॉर्म घोटाळा; भाजपच्या मुकेश शहाणे यांचे शक्ती प्रदर्शन, बडगुजर यांना दिला इशारा!
Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Sudhakar Badgujar |Mukesh ShahaneSarkarnama
Published on
Updated on

Mukesh Shahane vs Badgujar political conflict explained: नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या एबी फॉर्म चा वाद शमण्याऐवजी चिघळत चालला आहे. दोन एबी फॉर्ममुळे भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना उमेदवारी पासून वंचित राहावे लागले. त्यावरून पेटलेल्या राजकीय वादाचा भडका उडाला आहे.

भारतीय जनता पक्षाने वाटप केलेल्या एबी फॉर्मचा वाद वाढला आहे. संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी इच्छुकांची समजूत काढली. वाद विसरून भाजप उमेदवारांच्या प्रचाराला लागण्याचे आवाहन देखील केले.

उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या नाराज इच्छुकांनी मात्र बंडाचा झेंडा अद्याप खाली ठेवलेला नाही. त्यामुळे आणखी काही दिवस नेत्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांनी नाराज इच्छुकांना तूच करण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
MNS candidates missing : मतदानाआधीच राजकीय भूकंप! ऐन महापालिकेच्या रणधुमाळीत मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? निवडणुकीत नवा ट्विस्ट

यामध्ये एबी फॉर्म पळवा पळवीचा नवा मुद्दा तापला आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या जागेवर दोन एबी फॉर्म देण्यात आले. त्यात आधी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबातील उमेदवार पात्र ठरला.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Nashik Politics : 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणणाऱ्यांकडूनच गुन्हेगारांच्या कुटुंबियांचे उमेदवारी देत पुनर्वसन!

माजी नगरसेवक शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे सुचित केले. अपक्ष उमेदवार म्हणून ते किती तग धरतात हा उत्सुकतेचा विषय होता.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना भाजपने पराभूत केले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा इशारा शहाणे यांनी दिला होता. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी शहाणे यांची धडपड सुरू झाली आहे.

माजी नगरसेवक शहाणे यांनी बुधवारी प्रभागात आपल्या समर्थकांसह रॅली काढली. यावेळी रॅलीत शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तरीही जनसंपर्क सुरूच ठेवल्याचे संकेत त्यांनी दिले.

माजी नगरसेवक शहाणे आणि श्री बडगुजर हे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. विरोध आणि वादाची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे.

आगामी काळात प्रभाग क्रमांक २९ येथून अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार किती काळ टिकतो? याची त्यांच्या समर्थक आणि विरोधक दोघांनाही उत्सुकता आहे. या संदर्भात सुधाकर बडगुजर यांनी वरिष्ठ नेत्यांमार्फत शहाणे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी पडद्यामागे सेटलमेंटचेही प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये शहाणे यांना थांबवण्यात बडगुजर यशस्वी ठरतात का याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com