Bjp delegation at sarkarwada police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपने गाठले पोलिस ठाणे!

नाशिक भाजपचे सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिले निवेदन

Sampat Devgire

नाशिक : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे. हे अत्यंत गैर आहे. ते कदापी सहन केले जाणार नाही. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सुचनेनुसार आज शहराध्यक्ष (BJP) गिरीश पालवे यांसह पदाधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलिसांत निवेदन दिले. याबाबत लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात शहरातील कार्यकर्ते आक्रमक असल्याचे श्री. पालवे यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जर तर अशा स्वरुपात एक वक्तव्य केले तर राज्यातील पोलिसांनी कारवाई केली पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधानांबाबत असे बोलतात आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर पंतप्रधानांच्या विरोधातील कारस्थानामागे हात असल्याचा आरोप करतात तरीही पोलीस कारवाई करत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली तर काँग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळेल यामुळे सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात आहे. पण भाजपा हे सहन करणार नाही.

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळात सुनिल देशाई, अविनाश पाटील, संतोष नेरे, चारुदत्त आहेर, भास्कर घोडेकर, प्रविण अलई यांचा समावेष होता. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास पुढील आंदोलनाची पक्षाची तयारी असल्याचे यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांना सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT