कामगार चक्रव्युहात...`एसटी` संप बेकायदा, होमगार्डना हवे ‘लालपरी’चे स्टेअरिंग!

राज्यात चार हजार परवानाधारक होमगार्डचे जवान आहेत.
Homeguards & ST Depot
Homeguards & ST DepotSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) कर्मचारी संपावर असल्याने थांबलेली प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी एसटीचे स्टेअरिंग गृहरक्षक दलाच्या हाती द्या. त्यासाठी राज्यभरात (Maharashtra) चार हजार जवान तयार आहेत, अशी मागणी होमगार्ड विकास समिती आता परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे करणार आहेत.

Homeguards & ST Depot
Shocking; महापालिकेने कोरोनाबळींची आकडेवारी दडवली?

संपावर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबाबत सोमवारी दोन घटना घडल्या. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कामगारांता संप मुंबई कामगार न्यायालयाने बेकायदा ठरवला. तर दुसरीकडे राज्यातील गृहरक्षक दलाच्या पातळीवर होमगार्ड विकास समितीने लालपरीचे स्टेअरींग आम्हाला द्या. आम्ही एसटी चालवतो, अशी मागणी केली. विविध संघटनांनी संपातील विलीनीकरणाच्या मागणीपासून फारकत घेतली. त्यानंतरही कामगार कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे आता एसटीचे काही कामगार कामावर परतल्याने रस्त्यांवर एसटी धाऊ लागली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आवाहन करीत आहेत. अशा परिस्थितीत संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची मनस्थिती चक्रव्युहात अडकल्यासारखी झाल्याचे दिसते. त्यामुळे हे कामगार काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

Homeguards & ST Depot
भाजप नेते दिनकर पाटील यांची संचालकांना सभेतच शिवीगाळ?

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व वेतनवाढ करावी या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक सध्या संपावर आहेत. संप मिटेपर्यंत प्रवाशांची सोय व्हावी व राज्य शासनाला मदत करण्यासाठी गृहरक्षक दल तयार असल्याचे विकास समितीने म्हटले आहे. राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासमादेशकांनी आदेश काढल्यास राज्यभरातील चार हजार गृहरक्षक दलाचे जवान लालपरी चालविण्यासाठी तयार आहेत. या जवानांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानादेखील आहे. देशात व राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, तर गृहरक्षक सैनिकांची त्या जागी नेमणूक करावी, अशी तरतूद राज्याच्या होमगार्ड अधिनियमात आहे. त्यामुळे आम्ही कर्तव्य समजून राज्य शासनाला मदत म्हणूण बस चालवायला तयार आहोत. त्यासाठी शासनाने आदेश काढावा, याची आम्ही वाट पाहत आहोत, असा दावा संघटनेने केला आहे.

दरम्यान अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यावर राज्यातील एसटीची चाके आता कुठे पूर्वपदावर येतील अशी चिन्हे दिसत आहेत. कामावर हजर होऊ इच्छिणाऱ्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षणाची हमी मिळावी म्हणून एसटी महामंडळाकडून संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. वारंवार विनंती करून देखील कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा'अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी कारवाई टाळण्यासाठी एसटीचे वरिष्ठ अधिकारी थेट संपकरी चालक-वाहकांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करू लागले आहेत.

---

नाशिक शहर व जिल्ह्यात ८०, तसेच राज्यात चार हजार गृहरक्षक दलाच्या जवानांकडे अवजड वाहतुकीचा परवाना आहे. राज्याकडून आदेश आल्यास आम्ही त्वरित हजर होऊ. या मागणीसाठी गृहमंत्री, परिवहनमंत्री व महासमादेशकांना निवेदन पाठवणार आहोत. आम्हाला संधी द्यावी.

-नितीन गुणवंत, अध्यक्ष, होमगार्ड विकास कार्य समिती

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com