Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : भाजपला नाशिकमध्ये दुसऱ्यांचे ओरबाडता आले नाही, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut On Nashik BJP : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीवरुन भाजमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्या राजीनाम्यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

Ganesh Sonawane

Sanjay Raut Criticises BJP Over Approved Corporator Selection in Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीवरुन गोंधळ झाला. त्यात भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांची विकेट पडली आहे.

भाजपची स्वीकृत नगरसेवकांची यादी निश्चित करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना नावे न पाठवल्याने संतप्त झालेल्या चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनिल केदार यांचा राजीनामा घेतला. या घडामोडीवरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, काल माझ्या कानावर आलं की, नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. त्यात उबाठा शिवसेनेचे हेमंत गायकवाड व बाबा गाडकवाड असे दोन जण स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झाले. आमचं संख्याबळ तसं एक जागा मिळण्या इतक होतं, पण दोन जागा आम्हाला मिळाल्या. भाजपलाही त्यांच्या सहा जागा मिळाल्या. मात्र, भाजपला नाशिकमध्ये दुसऱ्यांचे ओरबाडता आले नाही, त्यामुळे त्याच्यात गोंधळ झाला असेल असा टोला राऊत यांनी लगावला.

भाजपमधून ज्या सहा नावांची नियुक्ती झाली, त्या नावांवरूनही त्यांच्यात काही मतभेद असू शकतात. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून आता मराठवाड्यात त्याविषयावर मी बोलणार नाही. मात्र, नाशिकमध्ये गेल्यास सविस्तर बोलेले असं राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी कॉंग्रेस व शिवसेना (उबाठा) यांच्या शहर विकास आघाडीत वाद लावून भाजपने एक अतिरिक्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपचा हा डाव फसला. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपला नाशिकमध्ये दुसऱ्यांचे ओरबाडता आले नाही असा टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

मोदींचा राजयोग संपला...

दरम्यान, राऊत यांनी यावेळी, राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख करत, काँग्रेसला मिळालेल्या यशाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, आतापर्यंत भाजपने ज्या निवडणुका जिंकल्या त्या सरळ मार्गाने जिंकलेल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक यंत्रणेवर जो जनतेचा दबाव आहे, त्यामुळे राजस्थानमध्ये त्यांना काही गडबड करता आली नाही. त्यामुळे भाजपविरोधाचा प्रवाह दिसला. हा प्रभाव कायम राहिला तर २०२९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि मोदींचा राजयोग संपला आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT