Devyani Pharande & BJP Agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tipu Sultan Politics: टिपू सुलतान वाद; सपकाळ यांच्याकडून भाजपने उद्धव, राज ठाकरेंना घेरले, म्हणाले...

Nashik BJP Devyani Farande Tipu Sultan controversy Congress state president Harshvardhan Sapkal agitation-भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत केले आंदोलन

Sampat Devgire

Congress Vs BJP News: काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक आहे. त्यानिमित्ताने भाजपला काँग्रेसवर टीका करण्याची संधी मिळाली. मात्र भाजपने या आडून भाजप विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला.  

म्हैसूर येथील संस्थानिक टिपू सुलतान यांचा फोटो मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात लावण्यात आला होता. त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. आता हा फोटो काढण्यात आला, मात्र राजकारण थांबण्याची चिन्हे नाही. 

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान विषयावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भाजपला उत्तर दिले. भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. त्यांचे हे विधान भाजपने राजकीय मुद्दा केले आहे.

त्यावरून भाजपने राज्यभर काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले. आज आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतान यांची तुलना केली. ही तुलना गैर लागू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. टिपू सुलतान हा मात्र मुस्लिम धर्मांध वादी होता असा दावा आमदार फरांदे यांनी केला.  

राज्यातील सर्व जनता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे तयारी करीत आहे. असे असताना सपकाळ यांनी सर्व शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व शिवाजी महाराजांचे अनुयायी सपकाळ यांच्या विरोधात तुटून पडले आहेत. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली. 

या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, संजय राऊत यांसह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार ही मंडळी शांत का? त्यांची या प्रश्नावर काय भूमिका आहे? असा प्रश्न करून भाजपने सपकाळ यांच्याकडून ठाकरे बंधूनाही घेरण्याचा प्रयत्न केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT