ATS Raid in Muslim Area : ‘ATS’चा मोठा सर्जिकल स्ट्राईक? बहुसंख्य मुस्लिम भागात 10-12 ठिकाणी छापे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त?

ATS Raid in Ahilyanagar Mukundnagar Nashik-Mumbai Team Action : अहिल्यानगरमधील बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरमध्ये 'ATS'ने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
ATS Raid in Muslim Area
ATS Raid in Muslim AreaSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar ATS Raid : अहिल्यानगरमधील बहुसंख्य मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरमध्ये ‘ATS’ने आज पहाटे छापेमारी केली. तब्बल 10 ते 12 ठिकाणी हे छापे घातल्याची माहिती समोर येत आहे. यात काही ठिकाणाहून इलेक्ट्राॅनिक्स साहित्य देखील ताब्यात घेतल्याची माहिती समजते.

राष्ट्रीय सुरक्षिततेचा भाग म्हणून, याबाबत तपास यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. परंतु ‘ATS’च्या या कारवाईमुळे अहिल्यानगरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

‘ATS’ने काल मध्यरात्रीनंतर अहिल्यानगर शहरात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम (Muslim) भागात कारवाईला सुरवात केली. मुकुंदनगरमधील तब्ब 10 ते 12 ठिकाणी छापे घातले आहेत. छापे नेमके कुठे घातले, कारवाई कशी सुरू आहे, याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती.

परंतु कारवाईत छापा घातलेल्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसंच कोण-कोठे संपर्कात आहेत, याची देखील तपासणी करण्यात आली. यात काही इलेक्ट्राॅनिक्स उपकरण देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई मध्यरात्री नंतर तीन वाजल्यापासून ते आज दुपारपर्यंत सुरू होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

ATS Raid in Muslim Area
Fake birth registration FIR : मोठा घोटाळा, गावची लोकसंख्या 1000 अन् जन्मनोंदी 3500! थेट गुन्हा दाखल!

मुंबई, नाशिक (Nashik), छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह राज्यातील ‘ATS’चे अधिकारी कारवाईत सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षकांसह तब्बल 15 पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांसह मोठा फौजफाटा होता. अहिल्यानगर पोलिस अधीक्षक अन् स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नंतर कारवाईत सहभाग घेतला.

ATS Raid in Muslim Area
Ganesh Naik : शिंदे पुत्राचं राजकीय भविष्य धोक्यात? गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रावर ‘वार’; ‘नावासमोर कायमचं माजी खासदार करीन!’

कारवाईबाबत गोपनीयता

या कारवाईत ‘ATS’ पथकाला काही संशयास्पद सापडल्याची चर्चा होती. पण कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गोपनीयता बाळगण्यात आली होती. माध्यमांना देखील यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. यासाठी राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत होतं.

संग्राम जगतापांचा सूचक इशारा चर्चेत

दरम्यान, अहिल्यानगरमधील ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार संग्राम जगताप यांनी, यावर पोलिस अधीक्षक कार्यालयावर गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला होता. तिथं मुकुंदनगरला मिनी पाकिस्तान म्हणत, लव्ह जिहाद, लँड जिहाद, जीम जिहाद आणि ड्रग्ज जिहादवरून घणाघात केला होता. आणि मुकुंदनगरमधील हालचालींकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती.

पूर्वी देखील राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे

आमदार संग्राम जगताप यांच्या या मागणीनंतर काही दिवसांत मुकुंदनगरमधील काही ठिकाणी ‘ATS’चे छापे पडले आहेत. त्यामुळे तर्कविर्तक लढवले जात आहे. चर्चा केल्या जात आहे. यापूर्वी देखील अहिल्यानगरमधील मुकुंदनगर, अलमगीर या भागात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घातले आहेत. कारवाया केल्या आहेत. मात्र ‘ATS’ने आता पहिल्यादांच मोठी कारवाई केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com