Girish Mahajan : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नाशिकमध्ये भाजपचे दोन माजी नगरसेवक सध्या वेगवेगळ्या गंभीर प्रकरणात अटकेत आहेत. त्यामुळे निवडणुक जवळ आली असतानाच शहरातील भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
बैलपोळ्याच्या दिवशी नाशिकच्या नांदुरनाका परिसरात झालेल्या राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात भाजपचे माजी नगसेवक उद्धव निमसे हे सध्या कोठडीत आहे. पंचवीस दिवस ते फरार होते त्यानंतर ते स्वत:पोलिसांना शरण आले. असे असतानाच रविवारी पंचवटीतील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली. पेठरोडला राहुलवाडी येथे झालेल्या गोळीबाराचा कट कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या शेखर निकम याच्या सोबत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी रचल्याच्या संशयातून पोलिसांनी पाटील यांना अटक केली.
विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन हे नाशिकमध्ये असतानाच पोलिसांनी जगदीश पाटील यांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे या कारवाईने शहरात खळबळ उडाली होती. भाजपचे लोकप्रतिनिधी गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडकत असताना संकटमोचक मंत्री गिरीश महाजन याप्रकरणावर काय बोलतात व काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते.
दरम्यान रविवारी माध्यमांशी बोलताना जगदीश पाटील यांच्या अटकेवर महाजन यांनी भाष्य केलं. गोळीबार प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाला अटक झाल्याचे कळाले. याप्रकरणात आपल्याला पूर्ण माहिती नाही. परंतु याप्रकणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही किंवा वाचविले जाणार नाही. दोषींवर कारवाई होईल. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई करावी असे आवाहन महाजन यांनी पोलिसांना केले आहे.
नाशिक शहरातील भाजपचे उद्धव निमसे व जगदीश पाटील या दोन माजी नगरसेवकांचा गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट संबंध असल्याच्या संशयातून पोलिसांनी या दोघांना अटक करत कारवाई केली आहे. या पोलीस कारवायांमुळे भाजपची प्रतिमा ढागळली असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला नक्कीच फटका बसणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. महापालिका निवडणुकीत विरोधकांकडून हे दोन्ही मुद्दे उचलून भाजपविरोधात प्रचार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.