Girish-Mahajan & Sunetra Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: धक्कादायक; सत्तेच्या सौद्यात अर्थखात्याचा बळी? राष्ट्रवादीकडून भाजपला, अजित पवारांचं खातं ‘गिफ्ट’!

Nashik BJP Girish Mahajan NCP leader Chhagan Bhujbal's financial account goes to BJP-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती सूचना

Sampat Devgire

NCP BJP News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. यामध्ये अजित पवार यांचे प्रतिष्ठित अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळालेले नाही. याविषयी होणाऱ्या चर्चेला आता वेगळेच उत्तर मिळाले आहे.

श्रीमती सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्याकडे असलेले सर्व खाते आणि निवासस्थान श्रीमती पवार यांना देण्याचा आदेश तातडीने काढण्यात आला. या सर्व घडामोडी अत्यंत जलद गतीने घडल्याने अनेकांना त्यावर प्रतिक्रिया देता आल्या नव्हत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची सर्व खाती सुनेत्रा पवार यांना दिली. यामध्ये महत्त्वाचे अर्थ खाते मात्र देण्यात आलेले नाही. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अर्थ खाते महत्त्वाचे मानले जाते. त्यावरून चर्चेला आणि वादाला तोंड फुटले होते.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, या सर्व घडामोडी अत्यंत घाई गडबडीत झाल्या. माझ्या सह भाजपचे प्रमुख मंत्री बारामतीत होते. त्यामुळे हे निर्णय कसे झाले, याची माहिती नाही. दूरचित्रवाहिनीवरील बातम्यांतूनच त्याची माहिती मिळते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी अर्थ खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच ठेवावे. त्यांनीच येणारा अर्थसंकल्प सादर करावा, अशी चर्चा झाली असावी, असे बातम्यांतून कळते. त्यानुसार अर्थ खाते कोणाकडे ठेवावे हा निर्णय झाला असावा, असे महाजन म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनानंतर गेल्या दोन दिवसात अतिशय वेगाने घडामोडी घडल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी पक्षाच्या आमदारांनी श्रीमती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती.

शनिवारी सायंकाळी श्रीमती पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी झालेल्या खाते वाटपामध्ये श्रीमती पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क यांसह अजित पवार यांच्याकडे असलेली खाते देण्यात आली. यामध्ये प्रतिष्ठेचे अर्थ खाते मात्र देण्यात आलेले नाही.

अर्थखाते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही. त्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू होत्या. त्यात सरकारवर टीका देखील होत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी दिलेल्या माहितीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT