

Girish Mahajan News : महापौर निवडणुकीच्या हालचाली गतिमान आहेत. पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अद्यापही आपले पत्ते उघडले नाही. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला धक्का देणारे विधान त्यांनी केले. पुढील आठवड्यात नाशिक महापालिका महापौर पदाची निवडणूक होणार आहे. महिला प्रवर्गासाठी महापौर पद राखीव आहे. त्यामुळे भाजपच्या इच्छुक महिला नगरसेविकांसाठी जोरदार लॉबिंग होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक विधान केले. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या दोन दिवसात यावर सहकाऱ्यांची चर्चा होऊन पुढील दिशा ठरेल. नाशिक महापालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली. त्याला 72 जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी अन्य कोणाचीही गरज भासणार नाही. भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे सूचक विधान त्यांनी केले.
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष भाजपसोबत सत्तेत येण्यासाठी धडपड करीत होता. असे संकेत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिले होते. मात्र त्याबाबत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी काही अटी घातल्या होत्या.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपला अटी घातल्याने नवा पेच निर्माण झाला होता. आता मंत्री महाजन यांनी त्यावर थेट विधान केले आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मोठा धक्का मांडला जातो.
मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी ज्या ठिकाणी महायुती होती तेथे युतीचे सहकारी पक्ष एकत्रित राहतील. नाशिक मध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी आमच्या विरोधात उमेदवार दिले. या स्थितीत भाजपला त्यांना सत्तेत सहभागी करण्याचा कोणताही दबाव किंवा सक्ती नाही.
मंत्री महाजन यांनी भाजप स्वबळावर महापालिकेत सत्तेत येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला अन्य सहकार्यांना सत्तेत सहभागी करणे गैरसोयीचे आहे. स्थानिक नेते आणि नगरसेवकांचाही तसा दबाव आहे. त्यामुळे 26 नगरसेवक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला आता विरोधात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.