Girish-Mahajan-Eknath-Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Operation Tiger Politics: ‘ऑपरेशन टायगर’वर गिरीश महाजनांचा मोठा इशारा; 'संधी कोण सोडणार', म्हणत राजकारण तापवलं!

Nashik BJP Girish Mahajan Statement Operation Tiger-कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणतात, 'ऑपरेशन टायगर' विषयी मला बोलायचे नाही, मात्र...

Sampat Devgire

Girish Mahajan News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "ऑपरेशन टायगर"ने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षही तुटून पडला. त्यामुळे याबाबत विविध नेत्यांच्या सूचक प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहेत. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे पक्षाला सुरंग लावण्याचे काम सुरूच आहे. या संदर्भात काही खासदारांची दिल्लीत गोपनीय बैठक झाल्याचे बोलले जाते. हे खासदार फुटणार असल्याची चर्चा जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. 

यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र कानावर हात ठेवले आहे. या ऑपरेशन विषयी आपल्याला काहीही माहिती नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. 

सध्या भारतीय जनता पक्षाचे कोणतेही ऑपरेशन लोटस सुरू नाही. शिवसेनेच्या ऑपरेशनचे काय ते आगामी काळात स्पष्ट होईल. असे काही होणार असेल तर ते लवकरच सगळ्यांसमोर येईल, असे मंत्री महाजन म्हणाले. 

ते म्हणाले, एक बाब मात्र खरी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोणीही आमदार किंवा खासदार राहण्यास उत्सुक नाही. हे लोकप्रतिनिधी अन्य पक्षात जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची संधी त्यांचे विरोधक सोडणार नाही. 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांबाबत ऑपरेशन टायगर राबविण्याविषयी भूमिका स्पष्ट केली. त्याचा शिवसेना ठाकरे पक्षाच्या विविध खासदारांनी समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार अरविंद सावंत यांनीही गंभीर टीका केली आहे. 

दुसरीकडे नाशिकच्या खासदारांनी या ऑपरेशन बाबत कानावर हात ठेवले आहे. अशा कोणत्याही ऑपरेशन टायगर विषयी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या खासदारांनी अशा कोणत्याही प्रकारात रस नसल्याचे म्हटले आहे. मात्र ठाकरेंच्या समर्थकांत अस्वस्थता वाढल्याचे लपून राहिलेले नाही.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT