Shivsena News : ऑपरेशन टायगर होणारच; शिंदेंच्या मंत्र्याने वाढवली उद्धव ठाकरेंची धाकधूक

Sanjay Shirsat statement News : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार गळाला लावण्यासाठी शिंदे यांनी संपूर्ण फिल्डिंग लावल्याची चर्चा होती.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट यानंतर राज्यात पुन्हा एकदा एका ऑपरेशनची चर्चा सुरू झाली. ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार गळाला लावण्यासाठी शिंदे यांनी संपूर्ण फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण आता ती काहीसी मागे पडली आहे. राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेडमध्ये पुन्हा या संदर्भात भाष्य केले. तर शिवसेनेचे मंत्री तथा राज्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही ऑपरेशन टायगर होणार आणि ते योग्य वेळी एकनाथ शिंदे करणार, असा दावा केला.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांनी या संदर्भात शिरसाट यांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी हा दावा केला. 'ऑपरेशन टायगर' कधीही सांगून केले जात नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे वैशिष्ट्य असे आहे की, ते योग्य वेळी अचूक निर्णय घेतात. कोणते ऑपरेशन कधी करायचे, यात ते माहीर आहेत, म्हणूनच त्यांना 'डॉक्टरकी'ची पदवी मिळाली आहे. ती वेळ आता जवळ आली आहे, असे शिरसाट म्हणाले.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Maharashtra Live News Update: 'त्या' सर्व शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार: महसूल मंत्री बावनकुळे

ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मुंबईत बोलावून घेत तंबी दिल्याचीही माहिती आहे. यावेळी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे अनुपस्थित होते. यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशातच संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ऑपरेशन टायगरची वेळ आली आहे, असे सांगत या चर्चेला पुन्हा हवा दिली आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Sanjay Shirsat News : पालकमंत्री कुठे आहेत? टीका होताच संजय शिरसाट गॅस, पेट्रोल टंचाईवर बोलले!

भोंदू अशोक खरात यांच्या इशाऱ्यावर सरकार चालते असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर बाबा लोकांचे ऐकून सरकार चालत नाही. सरकार चालवण्यासाठी आमचे नेते खंबीर आहेत आणि ते त्यांच्या स्तरावर निर्णय घेत असतात. जर बाबांच्या सांगण्यावरच सरकार चालले असते, तर बाबालाच मुख्यमंत्री करावे लागले असते.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली खासदारांची बैठक, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

भोंदू खरातची अनेक प्रकरणे आता बाहेर येतील. बलात्कार, फसवणूक, बनावट अंगठ्या विकणे, परदेशी गुंतवणूक आणि जमीन खरेदी यांसारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांतून खरातची सुटका होणार नाही. या साखळीत कोणाकोणाचा सहभाग होता, हे शोधून त्यांना अटक करण्याबाबत सरकार ठोस निर्णय घेईल. संजय शिरसाट यांनी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या विधानाचाही समाचार घेतला.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे लवकरच मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; महाराष्ट्राचं राजकारण हादरणार? महिला खासदारानं आतली बातमी फोडली

'खरातचे एन्काऊंटर होईल' अशी बकवास विधाने करून काही नेते समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. जर त्यांना इतकीच भीती वाटत असेल, तर वडेट्टीवारांनी त्याचे बॉडीगार्ड झाले पाहिजे. एखाद्याला मारून प्रकरण संपवून टाकायचे का? मग त्याने केलेल्या अत्याचाराचे काय? आरोपी असला तरी सरकार त्याची कायदेशीर काळजी घेत असते आणि शिक्षा सुनावल्यावर ती अंमलात आणते. असे आरोप करणे म्हणजे एक प्रकारे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिरसाट यांनी केली.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरेंसाठी आमदारकीची दुसरी टर्म कठीण? शिवसेना नेत्याचं मोठं विधान; म्हणाले,'एकनाथ शिंदेंना त्यांनी…'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com