NMC Election News: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने एक धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचा प्रचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शहरात तपोवन आतील वृक्षतोड वादाचा विषय बनला होता. यावर मंत्री गिरीश महाजन प्रारंभिक ठाम राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वृक्षतोडीचे समर्थन केले होते.
या प्रश्नावर नाशिक शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विषय महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शेवटपर्यंत टिकून राहिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही त्यावरून भाजपला टार्गेट केले.
यामध्ये सुरुवातीपासून भाजपचे बुद्धिजीवी प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक रोहन देशपांडे आक्रमक होते. पर्यावरण प्रेमी असलेल्या देशपांडे यांनी वृक्षतोडीला कठोर विरोध केला होता. भाजपच्या विविध नेत्यांकडे त्यांनीही भूमिका आग्रहाने मांडली होती.
भाजपने या पार्श्वभूमीवर मतदानाला दोन दिवस असताना रोहन देशपांडे यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. पडतर्फ करताना तपोवन आतील वृक्षतोडीवर भूमिका घेणे हे कारण दिले आहे. त्यामुळे मागे पडलेला वृक्षतोडीचा विषय निवडणुकीच्या शेवटी पुन्हा एकदा समोर आला.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी या विषयाला आपले समर्थन दिले. ४७ उमेदवारांनी वृक्षतोडीला विरोध असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये सर्वाधिक 19 आम आदमी पार्टी तर 15 शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत गोदावरी स्वच्छता, वृक्ष लागवड आणि पर्यावरण हा विषय सर्वच पक्षांना जाहीरनाम्यात घ्यावा लागला. तपोवन आतील वृक्षतोड हा त्यामागील दबाव होता. असे असताना भाजपने मागे पडलेल्या वृक्षतोडीच्या विषयाला देशपांडे यांची हकालपट्टी करून पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.
महापालिका निवडणुकीत राजकीय पक्ष आणि नेत्यांनी वृक्षतोड आणि गोदावरी स्वच्छता यावर भाजपला घेरले. शहरात गेली पाच वर्षे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे त्यांना बचावात्मक पवित्र घेणे भाग पडले. आता हा विषय मतदानावर परिणाम करेल काय? याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात ते स्पष्ट होईल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.