Kirit Somaiya Press Conference Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya Argument:`माझा माईक अन् माझंच ऐका!` किरीट सोमय्या यांचा थयथयाट चर्चेत!

Kirit Somaiya "Majha Mic Ani Majhach Aika" full story: किरीट सोमय्या यांचा अजब दावा; म्हणाले, मुंबईत ८० टक्के फेरीवाले बांगलादेशी अन् माफीया!

Sampat Devgire

Kirit Somaiya News: भाजप नेते किरीट सोमय्या यांची विधाने आणि दावे नेहेमीच चर्चेचा विषय ठरतात. माध्यमांना त्याचा अनुभव अनेकदा आला आहे. नाशिकमध्ये मात्र त्यांनी केलेले असेच एक विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले. 

भाजपचे किरीट सोमय्या यांनी मालेगाव महापालिकेत वर्षभर आरोपांचा पाऊस पडला होता. आता त्यांनी आपला मोर्चा नाशिक शहराकडे वळवला आहे. त्यासाठी त्यांनी महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत त्यांच्याच दालनात पत्रकार परिषद घेतली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिक राहत असल्याचे दावे सातत्याने करत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेले जन्मदाखले बनावट असल्याचा दावा ते करतात. त्यातून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फीला सामोरे जावे लागले.

नाशिक महापालिकेत माजी खासदार सोमय्या यांनी असाच प्रयोग सोमवारी केला. यावेळी त्यांनी नाशिक मध्ये अठरा हजार जन्म दाखले बनावट असल्याचा दावा केला. हे दाखले बांगलादेशी व वादग्रस्त नागरिकांना देण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. महापालिका प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

त्यावेळी त्यांनी मुंबई शहरात ८० टक्के फेरीवाले बांगलादेशी आणि मुस्लिम माफिया असल्याचा अजब दावा केला. त्यांच्या या धक्कादायक विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत महापालिका प्रशासन या लोकांना संरक्षण देत असल्याचा दावा त्यांनी केला.  

त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी गृह विभागाकडे ही माहिती नाही का? आजवर किती बांगलादेशी नागरिक परत पाठविण्यात आले? सोमय्या देत असलेली माहिती मुंबई पोलिसांकडे नाही का? अशी विचारणा केली.

यावर माजी खासदार सोमय्या उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच भडकले. तुम्हा पत्रकारांचा वन पॉइंट प्रोग्राम आहे का? असे सांगत त्यांनी पत्रकारांशी वाद घालण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेरात हे सर्व चित्रित होत होते.

गेली अकरा वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. या कालावधीत किती बांगलादेशी नागरिकांवर कारवाई झाली? ती जणांना देशाबाहेर पाठवले? असा प्रश्न करताच उत्तर देण्याऐवजी सोमय्या पत्रकारांशी वाद घालू लागले. पत्रकार आणि सोमय्या यांच्यात हा वाद चांगलाच वाढल्याने काही नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व वाद थेट महापौरांच्या कक्षातच सुरू होता. कोणतेही संवैधानिक पद नसताना सोमय्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी कशा घेतात? काही प्रश्न यावेळी करण्यात आला. एकंदरच सोमय्या यांची भूमिका "माझा माईक आणि माझेच ऐक" अशी होती. मात्र पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न करतात वाद वाढू लागल्याने अखेर सोमय्या यांनी काढता पाय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT