Pratap Dada Sonawane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pratap Dada Sonawane: भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन

संपत देवगिरे

Nashik News : भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे (वय 75) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. सटाणा येथील रहिवासी असलेले सोनवणे यांच्या कुटुंबात राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील माजी आमदार नारायण मनसाराम सोनवणे यांनी विविध क्षेत्रात काम केले होते. त्यांचा वारसा प्रताप दादा सोनवणे यांनी पुढे नेला.

प्रताप दादा सोनवणे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चिटणीस तसेच सभापती राहिले होते. प्रताप दादा सोनवणे यांनी दोन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. विधान परिषदेचे दिवंगत सभापती ना.स. फरांदे यांच्यानंतर 1998 आणि 2004 असे दोन वेळा ते नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धुळे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यावर 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते अमरीश पटेल यांचा पराभव करून धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

सध्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT