Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून फारआधीच 'शंभर प्लसचा' नारा देण्यात आला आहे. शंभरहुन अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात इनकमिंग मोहीम राबवली होती. त्यामुळे भाजप नाशिकमध्ये मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेतो की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अद्याप नाशिकमध्ये महायुतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. एकीकडे युतीबाबत शिवसेना व भाजप मध्ये खलबते सुरु आहे. असे असताना भाजपमधील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी इच्छुक उमेदवारांनी मात्र २०१७ प्रमाणेच स्वतंत्र लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपकडे सर्व १२२ ठिकाणी सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे युती करू नये या सर्वांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे कळविल्या असल्याची माहिती स्वत: भाजप अध्यक्ष सुनील केदार यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युती होण्याची शक्यता धूसर आहे.
शिवसेनेचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भाजपसोबत युतीसंदर्भात बोलणी सुरु आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत ते प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करणार आहेत. फोनवरही त्यांचे महाजन यांच्यासोबत बोलणे झाले आहे. दोघांच्या चर्चेनंतर युतीबाबत अंतिम निर्णय होईल असे सांगितले जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेण्यासंदर्भात अजून चर्चा झाली नसल्याचं दादा भुसेंनी सांगितलं आहे.
भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाचा दुसरीकडे शिवसेनेने देखील इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. भाजप-शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्या अशी अपेक्षा दादा भुसेंनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मित्रपक्षांच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करणे तुर्त तरी शक्य दिसत नाही असं भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जरी महायुतीम्हणूनच निवडणूका लढवल्या जातील असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर गणित वेगळं आहे. भाजप शहराध्यक्षांनीच 'युती नको आपण स्वतंत्र लढू' या कार्यकर्त्यांच्या व इच्छुक उमदेवारांच्या भावना वरिष्ठांना कळवल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.