Uddhav Thackeray On Bjp  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: ठाकरेंच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करा! निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मोठी मागणी

BJP Politics: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. यातून राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळालं.

Amit Ujagare

BJP Politics: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. त्यामुळं आपल्यालाच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणि त्यामुळं आपलाच महापौर व्हावा यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे रणनीती वापरुन वाट्टेल तशा युत्या आणि आघाड्या करत किंवा स्वतंत्रपणे लढत उमेदवारी अर्ज दाखल केले. यातून राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळालं. त्यातच आता भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांकडं एक मोठी मागणी केली आहे. त्यानुसार ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये हा प्रकार घडला असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मोठी मागणी केली आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या ए बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यानं त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी भाजपनं केली आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळं आता भाजपने केलेल्या मागणीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष असेल.

पत्रात काय म्हटलंय?

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सुनील केदार म्हणतात, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या उमेदवारी अर्जास जोडपत्र -२ (बी फॉर्म) जोडणे बंधनकारक आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच उमेदवारांच्या उमेदवारी अर्जास जोडलेल्या जोडपत्र-२ वर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे.

पण निवडणूक नियमावलीनुसार जोडपत्र -२ वर अधिकृत व मूळ स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेलं जोडपत्र वैध धरता येत नाही. याद्वारे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानं ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावेत ही विनंती. आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनील केदार यांनी हे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT