BJP MLA Devyani Pharande : नाशिक एमएमआरडीएच्या विकास योजनेतील त्रुटी दूर करून लवकरात लवकर त्याला मंजुरी दिली जाईल. याबाबतच्या निधीसाठी एक विस्तृत बैठक घेऊ. महापालिकेच्या हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून गावे येण्यास तयार असल्यास शहराची हद्दवाढ केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. (State Government will approve Nashik MMRDA DP Plan in coming two weeks)
आमदार फरांदे (Devyani Pharande) यांच्या लक्षवेधी सुचनेवर उद्योग मंत्री सामंत (Uday Samant) यांनी राज्य शासनाकडे (Maharashtra) आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी आहेत. त्या दूर करून लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात येईल. लगतची गावे तयार असल्यास त्यांना महापालिकेत (NMC) समाविष्ट करण्यास शासन त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगतले.
नाशिक शहराचा पुणे शहराच्या धरतीवर विकास व्हावा या विषयावर आमदार फरांदे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्या म्हणाल्या, पुणे शहराचे क्षेत्रफळ अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीटर होते. ते आता सात हजार किलोमीटर झाले आहे. त्यामुळे पुणे शहराप्रमाणेच नाशिक शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
समृद्धी महामार्गामुळे नाशिक मुंबईपासून अवघ्या दीड तासांच्या अंतरावर आले आहे. शहरालगतच्या त्र्यंबेकश्वर, दिंडोरी, ईगतपुरी, सिन्नर आदी सहा तालुक्यांत ज्याला ‘पेरी अर्बन एरिया’ संबोधले जाते. त्याला ‘फ्रींज’ एरिया आणि प्रादेशिक विकास आऱाखड्यातील भागाच्या विकासासाठी सरकार लक्ष देणार का? असा प्रश्न फरांदे यांनी केला.
या भागाचा कोणताही विकास आराखडा झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, नाशिक महापालिकेलगतच्या चांदशी आणि जलालपूर गावात लोकांनी इमारती, घरे बांधली आहेत. मात्र ‘एमएमआरडीए’कडे निधी नाही गेल्या सहा वर्षात काहीही निधी उपलब्ध केलेला नसल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेथील छत्तीस मीटरचा रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे ही मिसिंग लिंक दूर करण्याची गरज आहे.
राज्य शासनाने याबाबत तातडीने नियोजन आराखडा तयार करावा. त्यासाठी 30 ते 40 कोटींचा निधी शासनाने उपलब्ध कारावा. आकृतीबंध मंजूर करावा. आगामी सिंहस्थाच्या नियोजनात विल्होळी ते त्र्यंबकेश्वर रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना लवकर पोहोचता येईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.