Bhaskar Jadhav News : 'अण्णांना माझा सलाम..!' ; का म्हणाले भास्कर जाधव असे...

Lokayukta Bill passed : लोकायुक्त विधेयक मंजूर होताच उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत उडविली खिल्ली...
MLA Bhaskar Jadhav, Anna Hazare
MLA Bhaskar Jadhav, Anna HazareSarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Jadhav News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त विधेयक मंजूर होताच उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला. त्यांना ज्यापद्धतीने उत्तर दिले आहे, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

"अण्णा जागे झाले ? कधी ? अरे बापरे..! २०१४ पासून भाजपचे सरकार आल्यापासून अण्णा झोपलेले होते. त्यांना आज ठाकरे दिसले, आता सत्तेवर ठाकरे आहेत ? व्वा..! अण्णांना माझा सलाम.. चला..!" अशा शब्दात जाधव यांनी अण्णांचा समाचार घेतला. लोकायुक्त विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत मंजूर होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती.

MLA Bhaskar Jadhav, Anna Hazare
Mahajan Vs Khadse : ''चोऱ्या, आर्थिक घोटाळ्यांमुळे खडसेंना भाजपमधून हाकललं'' ; महाजनांचे खळबळजनक विधान!

आमचे सरकार लोकायुक्त कायदा करेल, असे ठाकरे सरकारने सांगितले होते, पण केले नाही. त्यांना नकोच होता, देवेंद्र सरकारने केले. किती वर्षे वेळ लागला, पण कायदा केला. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारला हा कायदा नकोच होता, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी ठाकरेंना फटकारले आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या टीकेवर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना विचारल्यावर त्यांनी तेवढ्याच आक्रमक पद्धतीने उत्तर दिले आहे.

अण्णा हजारे यांच्यावर राज्यातील काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही वर्षापूर्वी देखील आरोप केले होते. काँग्रेसच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे भाजपच्या भ्रष्टाचारावर काही बोलत नाही. देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आंदोलनांपासून काहीसे दूर असल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमके याच मुद्यावर विरोधकांकडून हजारेंकडे बोट दाखवले जाते. भाजपच्या काळात अण्णा हजारे शांत बसल्याचा आरोप करतात. मध्यतंरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंवर सडकून टीका केली होती. तसे ट्विट देखील केले होते. यावर अण्णा हजारे यांनी नोटीस बजावली होती.

(Edited by Amol Sutar)

MLA Bhaskar Jadhav, Anna Hazare
Parliament Security Breach: "संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर नरेंद्र मोदी पळ काढतायेत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com