Nashik Collector Ayush Prasad Fake WhatsApp account : नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट अकाउंटवरून नागरिकांना संदेश पाठवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अकाउंटवर जिल्हाधिकाऱ्यांचे ‘Ayush Prasad’ असे नाव व फोटो वापरण्यात आला आहे. तसेच +66 92 455 6074 या थायलंड देशाच्या क्रमांकाचा वापर करण्यात आला असून, ‘Business account’ म्हणून हे अकाउंट दर्शविण्यात येत आहे. संबंधित क्रमांकावरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी सदर क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, फोनला अथवा अन्य स्वरूपातील संपर्काला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच या क्रमांकावर कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती देऊ नये.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे अकाउंट अधिकृत नसून, नागरिकांनी त्याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाच्या नावाने सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून प्राप्त होणाऱ्या संशयास्पद संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. संशयास्पद संपर्क आढळल्यास संबंधित यंत्रणेला त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.