Congress Party Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress : नाशिक महापालिकेत स्वबळावर लढण्यासाठी कॉंग्रेस फुल तयारीत; ठाकरे, पवार गटाचे काय?

Nashik Congress : वरिष्ठ जो आदेश देतील तो पाळूच पण कॉंग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुक लढविण्यासाठी तयार आहे, अशी माहिती कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.

Ganesh Sonawane

Nashik Congress : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वपक्षीयांची तयारी जोरात सुरु झाली आहे. महापालिकेची प्रारुप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर या तयारीने वेग पकडला आहे. कुंभमेळा असल्याने नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. शिवसेनेने देखील स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास 'प्लॅन बी' रेडी केला आहे. महायुतीपाठोपाठ आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस ने देखील शहरात स्वबळाचा नारा दिला आहे.

ही निवडणूक पक्षाच्या निष्ठावान कार्यकत्यांची असून, निष्ठावान कार्यकत्यांना न्याय दिला जाईल. त्यांना संधी दिली जाईल. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे. पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

रविवारी शहर कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीतही छाजेड यांनी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीकरिता तयार असून , पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळला जाईल असे सांगितले होते. आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येतील. अर्ज छाननी समिती कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा विचार हा लोकांच्या मनामनात खोलवर रुजलेला असून, कोणत्याही अफवा वा भीतीला बळी न पडता काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत आणि सत्तास्थापनेत काँग्रेसलाच प्राधान्य असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी म्हटले.

देशात परिवर्तनाची लाट उसळली आहे आणि त्या लाटेत नाशिक शहर मागे राहणार नाही. लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, जनतेचा विश्वास निवडणुकीत नक्कीच काँग्रेससोबत असेल, असे मत प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT