Nashik Municipality : मनपात परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमागे भाजपचा मोठा मंत्री? माजी नगरसेवकांमध्येही नाराजीचे फटाके

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये स्थानिक-परसेवेतील अधिकारी यांच्यात स्थापनेपासून वाद आहे. महुआ बॅनर्जी यांच्या नियुक्तीमुळे कुंभमेळ्याच्या तोंडावर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
Nashik Municipal Corporation And Manisha Khatri
Nashik Municipal Corporation And Manisha KhatriSarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipality : नाशिकमध्ये आधीच कुंभमेळ्याच्या नियोजनावरुन राजकीय संघर्ष व वाद सुरु आहे. शासनाने कुंभमेळ्याची कामे महापालिकेच्या माध्यमातून करणे अपेक्षित असताना प्राधिकरणाची स्थापना करुन त्यामार्फत कामे सुरु आहेत. अशातच आता महानगरपालिकेत स्थानिक व परसेवेतील अधिकारी यांच्या नियुक्तीवरुन नवा वाद उफाळला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून सिंहस्थाच्या कामांचे टेंडरिंगची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी महुआ बॅनर्जी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला शिवसेना(शिंदे गट) विरोध केला आहे.

कुंभमेळ्याच्या कामांदरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करून घेतात, मात्र त्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासन इतर संस्थांकडे सोपवते.. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांना सिंहस्थ कुंभमेळा व शहरातील कामांची अधिक माहिती आहे, त्यांना संधी दिल्यास ते चांगले काम करतील असा दावा शिवसेनेचा आहे. महापालिकेत तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असून नुकतेच आठ कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती दिली आहे. बॅनर्जी यांची नियुक्ती नगरविकास विभागामार्फत होणे अपेक्षित आहे. परसेवेतील बॅनर्जी यांच्याकडे टेंडरिंगचे सर्व नियंत्रण देणे चुकीचे असल्याचे मत शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी व्यक्त केले आहे.

फेब्रुवारीत कुंभमेळ्याच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता महुआ बॅनर्जी यांची नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेतील अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र वरून आदेश आले असल्याचे कारण देत आयुक्त मनीषा खत्री यांनी बॅनर्जी यांची नियुक्ती कायम ठेवली. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी या नियुक्तीला नगरविकास विभागाची मान्यता नसल्याचे सांगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आलेले प्रतिनियुक्ती आदेश बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता.

Nashik Municipal Corporation And Manisha Khatri
Girish Mahajan Politics : भुसे-भुजबळांना गिरीश महाजनांनी पुन्हा दाखवली 'पॉवर', एका आदेशात महापालिकेची यंत्रणा हलली

दरम्यान प्रतिनियुक्तीचा वाद वाढल्यानंतर बॅनर्जी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सोपवलेला नव्हता. परंतु बॅनर्जी यांना दोन दिवसांपूर्वी पदस्थापना देण्यात आल्याने पुन्हा नव्याने वाद निर्माण झाला. दरम्यान महापालिकेच्या अभियंत्यांच्या मनात आपल्यावर अविश्वास दाखल केल्याची भावना असल्याने त्यांच्यात नाराजीचे फटाके फूटत आहेत. परसेवेतील अधिकाऱ्यांच्या या नियुक्तीमागे भाजपमधील मोठे मंत्री असल्याने त्यांच्या हस्तक्षेपामुळे भाजपच्याच माजी नगरसेवकांमध्येही नाराजी दिसून येत आहे.

Nashik Municipal Corporation And Manisha Khatri
Shivsena UBT Politics: भाजप नेते उद्धव निमसे अडचणीत, युवकावर सशस्त्र हल्ला प्रकरण तापले!

म्युनिसुपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनीही महुआ बॅनर्जी यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंतापद १०० टक्के पदोन्नतीने भरले आहे. महुआ बॅनर्जी यांच्यासाठी रिक्त जागा नाही. बॅनर्जी यांना सहा महिने उशिराने पुन्हा मनपा सेवेत वर्ग करण्यास म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा विरोध आहे. बॅनर्जी कार्यकारी अभियंता हे त्यांचे सेवाज्येष्ठता यादीनुसार पाच वर्षांचा अनुभव पूर्ण करीत नाहीत असं बडगुजर यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com