Nashik Lok Sabha 2024 News : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी नुकतीच सुरू झाली आहे. मतमोजणी केंद्रावर सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी सकाळी सात पासूनच उत्साहाने दाखल झाले आहेत. उमेदवार या संदर्भात सातत्याने माहिती घेत होते. मात्र अद्याप येथे एकही उमेदवार दाखल झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराज बहुचर्चित अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीची मतमोजणी नाशिकमध्ये आहे. त्यांचे सर्व भक्त आणि मतमोजणी प्रतिनिधी केंद्रात आहेत. मात्र खुद्द शांतिगिरी महाराज काशीला आहेत त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.
नाशिकचे मतदान संपल्यावर शांतिगिरी महाराज वाराणसीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आपण जात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. वाराणसी येथे 28 मे ते 3 जून पर्यंत त्यांचे अनुष्ठान होते. या अनुष्ठानमध्ये शांतिगिरी महाराज सध्या व्यग्र आहेत.
दरम्यान मतमोजणी असल्याने शांतिगिरी महाराज आज (मंगळवार) सकाळी लखनऊ येथून निघनार आहेत. ते दुपारी शिर्डी विमानतळावर पोहोचतील. तेथून ते सायंकाळपर्यंत नाशिकला येतील, असे शांतिगिरी महाराज यांच्या निवडणूक समितीचे प्रमुख अरुण शेठ पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.