Devendra Fadnavis women MLA team announcement: नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणींचे धर्मांतर, महिलांचा विनयभंग आणि बलात्काराच्या गंभीर घटनांबाबत पावसाळी अधिवेशनात विधानसभेसह विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्या चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (दि. २४) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठा निर्णय जाहीर केला.
नाशिकसह सोलापूर येथील बहुराष्ट्रीय कंपनीत घडेलेलं धर्मांतरण प्रकरण व तळेगाव दाभाडे येथील कंपनीशी संबंधित लैंगिक छळ प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच खासगी कंपन्यांमधील धर्मांतर व लैंगिक छळाच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कायद्यांचा सखोल अभ्यास करुन आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी महिला आमदारांची विशेष समिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यात अशा प्रकरणांची पुनरावृत्ती राज्यात कुठेही होऊ दिली जाणार नाही. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान कायदे व नियमांचा आढावा घेण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले.
यासाठी विधानसभा व विधान परिषदेतील महिला आमदारांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. या समितीने सुचवलेल्या शिफारशींची राज्य सरकार अंमलबजावणी करेल', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक मधील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक व मानसिक शोषण आरोप प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर त्वरित कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या प्रकरणातील एकाही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आयटी आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 'अंतर्गत तक्रार समित्यांचे' ऑडिट होईल असं फडणवीसांनी सांगितलं.
या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) चौकशी जवळपास पूर्ण केली असून त्याच अहवालाच्या आधारे ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबधित कंपनीने देखील तपासात पूर्ण सहकार्य केलं आहे. या सर्व प्रकरणांतील आरोपपत्रे दाखल झाल्यानंतर अंतिम निष्कर्ष समोर येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.