CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक निर्णय, 'ते' विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार

Monsoon Session Women Farmers : पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी ऐतिहासिक बील मांडणयाची तयारी सरकारने केली आहे.
Chief Minister Devendra Fadnavis is expected to introduce a landmark bill granting legal status to women farmers during the Maharashtra Monsoon Session.
Chief Minister Devendra Fadnavis is expected to introduce a landmark bill granting legal status to women farmers during the Maharashtra Monsoon Session.sarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session News: उद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

महिला या शेतीची कामे करतात मात्र त्यांना शेतकरी म्हणून गृहीत धरले जात नाही. मात्र, या अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक मांडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत, असे देखील ते म्हणाले. आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायला तयार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले.

.फडणवीस म्हणाले, विरोधकांनी राजकारण केलं तर त्यांना राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल. तीन आठवणे पावसाळी अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करू, असे देखील ते म्हणाले.

Chief Minister Devendra Fadnavis is expected to introduce a landmark bill granting legal status to women farmers during the Maharashtra Monsoon Session.
MVA : महाविकास आघाडीच्या पत्रात काय? सरकारची होणार कोंडी!

चहापानावर मविआचा बहिष्कार

सरकारने विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, महाविकास आघाडीचे आज पत्रकार परिषद झाली. त्यामुळे चहापानावर बहिष्कार घातल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना महायुती सरकारमधील तीन पक्ष मात्र भांडत आहेत.या सरकारने जाहीर केलेली फसवी शेतकरी कर्जमाफी, भ्रष्ट कारभार व जनविरोधी धोरण, यांचा निषेध करत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहोत, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सांगितले.

Chief Minister Devendra Fadnavis is expected to introduce a landmark bill granting legal status to women farmers during the Maharashtra Monsoon Session.
MVA Letter : पावसाळी अधिवेशन वादळी होणार! 'मविआ' एकत्र, 'ते' 13 मुद्दे मांडत सरकारची कोंडी, मास्टर प्लॅन तयार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com