CPI Maharashtra convention Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CPI Maharashtra Convention: 'भारताकडून अमेरिका, इस्राईलची दलाली'; मोदींची सत्ता भांडवलदारांची म्हणत भाकपचा हल्लाबोल

CPI Accuses Modi Government of Acting as Agents of US and Israel: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पंचविसाव्या नाशिकमधील राज्य अधिवेशनात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला.

Pradeep Pendhare

Nashik CPI State Convention : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पंचविसाव्या नाशिकमधील राज्य अधिवेशनात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला.

'केंद्रातील मोदी सरकार जागमधील युद्धाला विरोध करण्यासपेक्षा अमेरिका आणि इस्त्राईलची दलाली करत आहे', असा घणाघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर यांनी केला.

भाकपच्या (CPI) अमरजीत कौर म्हणाल्या, "जगामध्ये युद्ध सुरू आहे. मात्र त्याचा आपल्याशी संबंध नाही, असे समजणे चुकीचे आहे. ते युद्ध सामान्यांसाठी नसून भांडवलदारांसाठी आहे. आपल्या देशातील नेतृत्व याला विरोध करण्यापेक्षा अमेरिका व इस्राईलची दलाली करत आहे". देशाच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आदिवासी दलित व अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय विद्यमान सत्तेचा पाया आहे, असा घणाघात देखील अमरजीत कौर यांनी केला.

'केंद्र सरकार देशातील जनतेच्या नव्हे, तर अदानी-अंबानींसारख्या काही निवडक भांडवलदारांच्या हितासाठी कार्यरत आहे. सामान्य जनतेचे प्रश्नांकडे, रोजगार, महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हक्कांकडे सरकारने जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. आज ज्या पद्धतीने एका व्यक्तीला राष्ट्राच्या रूपात मांडले जात आहे, ते हिटलरवादी फॅसिझमवादाचे लक्षण आहे', अशी टीका करत अमरजीत कौर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लक्ष्य केले.

जातीजातीत भांडण अन् अशांतता

‘आम्ही समाजवाद मानतो, भांडवलशाहीला आमचा तीव्र विरोध आहे. इंग्रजांपासून देशाला मुक्त करण्यासाठी कम्युनिस्टांनी लढा दिला आहे. नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासींची कत्तल केली जात आहे. त्यांचा मूळ उद्देश वनक्षेत्रे भांडवलदारांना द्यायची आहेत. बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी कामगार महागाई या सर्वच क्षेत्रांमध्ये या सरकारला पूर्ण अपयश आले आहे. सामान्यांच्या मूलभूत समस्या व प्राथमिक गरजा भागविण्यापेक्षा जाती-जातीमध्ये भांडणे लावून अशांतता निर्माण केली जात आहे’, अशी जोरदार टीका अमरजीत कौर यांनी केली.

युद्धखोरांच्या बाजूने भारत

अमेरिकेवरून येणाऱ्या वस्तूंवर शून्य कर लावला गेला. पण अमेरिका मात्र भारतीय वस्तूंवर जास्तीत जास्त कर लावत आहे. अशा प्रकारचे धोरण भारताच्या स्वाभिमानाला आणि स्थानिक उत्पादनांना मारक असल्याचे अमरजीत कौर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘भांडवलशाही जगभरात युद्धजन्य स्थिती निर्माण करून आपली शस्त्रे विकण्याचा धंदा चालवत आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष, अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले, हे त्याचे उदाहरण आहे. भारतही आज या युद्धखोरांच्या बाजूने उभा आहे, जे आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या आणि शांततेच्या तत्त्वांशी पूर्णतः विसंगत आहे.’

देशभरातील प्रतिनिधींचा सहभाग

भाकप पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो अध्यक्षस्थानी होते. ॲड. सुभाष लांडे, राजू देसले, स्मिता पानसरे, पद्म पाशा, तुकाराम भस्मे, राजन क्षीरसागर, शिवकुमार गणवीर, सुकुमार दामले, प्रकाश रेड्डी, एम. ए. पाटील, श्याम काळे, राम बाहेती आदींसह राज्य आणि देशभरातून प्रतिनिधी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT