Haribhau Bagde : राज्यपालांचा ताफा रोखला! संभाजीनगरात संतप्त जनतेचा उद्रेक; गुन्हे दाखल होणार?

Governor Haribhau Bagde Convoy Stopped in front of Imtiaz Jaleel : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागातील नागरीकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण हटवल्यावरून जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला.
Haribhau Bagde Convoy Stopped At Chhatrapati Sambhajinagar
Haribhau Bagde Convoy Stopped At Chhatrapati Sambhajinagarsarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण हटवण्यावरून मोठा राडा पाहायला मिळत आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात येथे कारवाई करत अतिक्रमण हटवताना शेकडो दुकाने आणि घरे पाडली होती. या कारवाईवरून या भागात मोठा संताप व्यक्त करण्यात आला असून आजही रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा फटका रविवारी (ता. 22) राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना बसला. आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. यामुळे पोलिस आणि आंदोलकांत मोठी झटापट झाली असून आता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या आंदोलनावेळी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील येथे उपस्थित होते. (Governor's Convoy Stopped During Protest Over Demolition in Chhatrapati Sambhajinagar)

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी हटवले. या कारवाईत पोलीस बंदोबस्तात शेकडो दुकाने आणि घरे पाडण्यात आली. ज्यानंतर जनतेचा उद्रेक पहावयास मिळाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील याठिकाणी नागरिकांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्याचवेळी चिकलठाणा विमानतळाकडून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा येत होता. यावेळी आंदोलक रस्त्यावर जमा झालेले असल्यामुळे राज्यपालांच्या गाडीला जाण्यासाठी मार्ग नव्हता.

दरम्यान, आंदोलकांना राज्यपाल हरिभाऊ बागडे वाहनात बसलेले असल्याचे कळताच ज्यांच्या घरावर व दुकानांवर कारवाई झाली त्यांनी गाडीसमोर येत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जलील यांनी देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वारंवार गाडीमध्ये राजस्थानचे राज्यपाल आहेत त्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून द्या, अशी विनंती केली. मात्र, आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होती. महिला, पुरुष आणि तरुणांनी गाडी समोरच ठिय्या देत घोषणा दिल्या.

Haribhau Bagde Convoy Stopped At Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : हाॅटेल खरेदीतून माघारीने संजय शिरसाट बॅकफूटवर! इम्तियाज जलील यांची सरशी..

माजी खासदारांसह पोलिसांनी वारंवार विनंती करूनही आंदोलकांनी जागा न सोडल्याने अखेर स्कॉड आणि पोलिसांच्या पथकाला गर्दीत उतरावे लागले. आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीनंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या ताफ्याला वाट करून देण्यात आली. त्यानंतर त्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

दरम्यान, राज्यपालांचा ताफा अडवल्याची माहिती समजतात पोलीस आयुक्तांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेतली. ज्यांनी कोणी राज्यपालांचा ताफा अडवला, त्या सगळ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा, कोणालाही सोडता कामा नये, असे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता ज्यांनी ज्यांनी राज्यपालांचा ताफा अडवला आणि गोंधळ घातला. त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच ते दहा मिनिटे हा सर्व गोंधळ मुकुंदवाडी भागात सुरू होता. राज्यपालांचा ताफा पुढे निघून गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांनाही पांगवले.

मुकुंदवाडीतील हत्या आणि त्यानंतर झालेल्या अतिक्रमणाच्या कारवाईवरून छत्रपती संभाजी नगरातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. पोलीस आणि प्रशासन गुंडगिरी करत आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. तर या कारवाई मागे भाजपच्या नेत्यांचा हात आहे. त्याच्या सांगण्यावरून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचाही दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Haribhau Bagde Convoy Stopped At Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : हाॅटेल खरेदीतून माघारीने संजय शिरसाट बॅकफूटवर! इम्तियाज जलील यांची सरशी..

दरम्यान, आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यपाल बागडे यांचा ताफा अडवू नका, असे सांगितले होते. तशी विनंतीही पोलिसांनी केली होती. मात्र, संतप्त जनतेचा उद्रेकापुढे कोणाचेही चालले नाही. पण आता या गोंधळावरून संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी सर्व आंदोलकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com