Nashik Crime News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : उपसरपंचाकडून दारुच्या नशेत बायकोची हत्या, झोपलेली असताना धारधार शस्राने वार; नाशिकमध्ये खळबळ

Deputy Sarpanch Murder Wife Nashik : नाशिक जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपसरपंच पतीने दारुच्या नशेत बायकोसोबत खटके उडाल्याने झोपेतच तीची हत्या केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिक जिल्ह्यातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उपसरपंच पतीने दारुच्या नशेत आपल्या पत्नीची हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतः देखील कीटकनाशक औषध पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गावाचे उपसरपंच जयराम पवार याने दारूच्या नशेत आपल्या पत्नी जिजाबाई पवार यांची झोपेत असताना धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंच पतीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मृत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेचं नाव जिजाबाई जयराम पवार असून वय वर्ष ६० इतके आहे. साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारु पवार असे संशयित मारेकरी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जिजाबाई आणि उपसरपंच जयराम पवार यांच्यामध्ये दारूच्या व्यसनावरून नेहमीच वाद व्हायचे. दरम्यान आज (दि. ३०) जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नेहमी प्रमाणे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार याने पत्नी जिजाबाई झोपेत असतांना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की जिजाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर जयरामने घरात असलेली पिकासाठी आणलेले किटकनाशक पिऊन स्वत:ही जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र किटकनाशक कमी विषारी असल्याने जयरामला काही झाले नाही. थोडाफार त्रास जाणवल्याने केवळ उलट्या झाल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गावाचा उपसरपंच हाच या प्रकरणात आरोपी निघाल्याने साकोरेपाडा गावासह संपूर्ण कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास कळवण पोलीस करत आहेत. (Nashik Crime)

धक्कादायक म्हणजे पहाटेच्या सुमारास या झालेल्या कृत्याची माहिती स्वतः जयराम पवार याने पोलीसांना दिली. पण पोलिस पाटील यांना जयराम हा दारूच्या नशेत असल्याने त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यानंतर पोलीस पाटील यांनी गावातील सरपंच यांना बोलावून जयराम यांच्या घरी गेले. तेव्हा घटनेचा उलगडा झाला. यावेळेस जयरामच्या घरी जिजाबाई या मृत अवस्थेत आढळल्या. त्यानंतर पोलीस पाटलांनी त्वरित कळवण पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT