Nilesh Pekhale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS Nashik Politics : नाशिक शहरात खून सत्र सुरूच; तडीपार मनसे नेत्याने केला सहकाऱ्याचा खून!

MNS leader commits murder in the city Illegal liquor controversy : अवैध दारूच्या व्यवसायाच्या वादातून निलेश डोईफोडे याच्या डोक्यात रॉड मारून खून केला.

Sampat Devgire

Nashik Crime News : नाशिक शहरात अनेक तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याने हे प्रकार वाढले आहेत. त्यात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याची चर्चा आहे.

नाशिक रोड भागात शुक्रवारी अवैध दारूच्या व्यवसायातून वाद झाला. यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मनसेचे शहर संघटक निलेश पेखळे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तडीपार होते. तडीपार असूनही त्याचा शहरात वावर होता.

हितेश डोईफोडे हे मनसे (MNS) स्थानिक नेते निलेश पेखळे याच्या निवासस्थानाजवळ गेला होता. तिथे आणखी दोन युवक उभे होते. त्यांच्याशी बोलणे सुरू असतानाच निलेश पेखळे याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून निलेश पेखळे याने जवळच ठेवलेल्या पिशवीतील रॉड काढला. आणि तो डोईफोडे यांच्या डोक्यात मारला. त्यात ते जखमी झाले. अन्य युवकांचाही त्यांनी पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डोईफोडे यांना रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाले. त्यानंतर पेखळे हा पोलिस ठाण्यात हजर झाला.

नाशिक (Nashik) रोड भागातील अवैध दारू व्यवसायाच्या पैशातून हा वाद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. खून झालेले डोईफोडे आणि पेखळे याच्याशी परिचय होता. त्यांच्यात वादही होता. त्यातूनच हा खून झाल्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.

गेले काही महिने नाशिक शहरात खुनांचे सत्र सुरू आहे. सराईत गुन्हेगार तसेच तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या सेवनातून हे प्रकार वाढत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या हत्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे गुन्हेगारीत अनेक तडीपार लोकांचा सहभाग आहे. शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा शहरातच वावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष मन्ना जाधव यांची देखील अशाच वादातून नुकतीच हत्या झाली होती.

या निमित्ताने गुन्हेगारीत राजकीय हस्तक्षेप आणि नेत्यांचा सहभाग उघड झाला आहे. अनेक तडीपार गुन्हेगार शहरात वावरत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याबाबत पोलीस सातत्याने टिकेचे लक्ष्य ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT