
Ahilyanagar NCP leader passes away : अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनाने पाथर्डी पालिकेचे पहिले नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घोडके व जगताप या दोघांनाही तालुक्यात राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. घोडके व जगताप हे दोघेही बालपणीचे मित्र. त्यांनी कोल्हापूरला सोबतच कुस्तीचे धडे गिरवले होते. पुढे दोघेही लाल मातीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यात उतरले आणि नगराध्यक्ष झाले.
पाथर्डी पालिकेत घोडके यांनी पहिला नगराध्यक्ष म्हणून मान पटकावत स्वबळावर पंधरा वर्षे सत्ता टिकवली. या काळात जगताप यांनी घोडके यांची पाठराखण केली. घोडके यांच्या पत्नी जनाबाई घोडके या पाथर्डी पालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आल्या. या निवडणुकीत (Election) जगताप हे घोडके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
जगताप यांचा एकेरी उल्लेख करणारी जी मोजकी माणसे होती, त्यात घोडके यांचा समावेश होता. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दैनिक सकाळच्या दिवाळी अंकात माझे बालपण या विषयवार लेख लिहिताना मी सुटीच्या दिवसात पाथर्डी येथे घोडके यांच्या घरी मुक्कामास राहत. असे लिहून घोडके यांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला होता.
पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीचे अहिल्यानगर येथे कुठल्याही सरकारी कार्यालयात काम असेल, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन असेल तर ती मंडळी घोडके यांची भेट घेणार अन् घोडके हे जगताप यांच्या माध्यमातून या अडचणी दूर करणार, असा पायंडा पडला होता.
जी मैत्री घोडके व जगताप यांच्यामध्ये होती, तीच मैत्री काळाच्या ओघात घोडके जगताप यांच्या दुसऱ्या पिढीत आली. आमदार संग्राम जगताप व घोडके यांचे चिरंजीव बजरंग घोडके यांचीसुद्धा अत्यंत घनिष्ठ मैत्र आहे. बजरंग घोडके यांच्या प्रचारासाठी संग्राम जगताप हे अनेकवेळा पाथर्डीला आले होते, तर त्यांच्या विजयी मिरवणुकीत जगताप यांनी अंगावर गुलालसुद्धा घेतला होता. जगताप यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर घोडके कुटुंबीय सातत्याने पुणे येथे थांबून होते. जगताप यांच्या निधनाने आता राम-लक्ष्मणाची जोडी फुटली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.