Nashik Crime Mystery | Prakash Londhe Gang Secrets | RPI Leader Investigation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : RPI नेते प्रकाश लोंढेच्या गँगला नाशिकमध्ये निर्माण करायची होती संघटीत गुन्हेगारी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Prakash Londhe Gang Secrets : आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात लोंढे यांची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामध्ये धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाल्याचे कळते.

Sampat Devgire

Nashik News, 15 Oct : आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात लोंढे यांची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामध्ये धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाल्याचे कळते.

आरपीआयचे नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे याची पोलीस कोठडी वाढविण्यात आली. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत प्रकाश लोंढे याचा चांगल्याच समाचार घेतला आहे. त्यातून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटकेत असलेल्या माजी नगरसेवक लोंढे यांचा दुसरा मुलगा भूषण लोंढे अद्यापही फरार आहे. तो सध्या महाराष्ट्र बाहेर फरार झाल्याचे बोलले जाते. पोलिसांनी आपले जाळे या गँग विरोधात आवडले आहे. त्यामुळे भूषणला नाशिकमधून मदत मिळालेली नाही.

यातील एक फरारी सनी विठ्ठलकर हा मध्य प्रदेशात पसार झाला होता. विविध ठिकाणी फिरल्यानंतर उज्जैनला त्याचे पैसे संपले. पैसे घेण्यासाठी तो नाशिकला आला असताना पोलिसांनी अटक केली.

फरारी विठ्ठलकर यास कोणीही मदत करण्यास तयार नव्हते. पोलिसांनीच यामध्ये जाळे रचले आणि मदतीची व्यवस्था झाल्याचा समज करण्यात आला. या जाळ्यात विठ्ठल कर अडकला. नाशिक येथे आला असताना त्याला अटक झाली.

दरम्यान प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात भुयारात दोन खोल्या आणि आलिशान व्यवस्था होती. येथून काही हत्यारेही जप्त करण्यात आली. याबाबत पोलिसांनी माजी नगरसेवक लोंढे यांचा चांगला समाचार घेतला.

या तपासातून प्रकाश लोंढे याने अनेक धक्कादायक माहिती दिल्याचे कळते. मुंबईसारखी संघटित टोळी बनवून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे नेटवर्क निर्माण करण्याचा या गँगचा कट होता. त्यात भूषण लोंढे हा मुख्य भूमिका बजावत होता. आरपीआयच्या माध्यमातून त्याने आपले नेटवर्क चांगलेच वाढवले होते. यातील अनेक गुन्हे अद्याप उलगडलेले नाहीत, अशी माहितीही पोलिसांना हाती लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT