Ravindra Erande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकचा दुसरा खरात, 'रवींद्र एरंडे'च्या अडचणी वाढल्या, 8 पीडित महिलांची ओळख पटली..

Ravindra Erande Case Nashik : रवींद्र एरंडेचे महिलांचे लैगिंक शोषण करतानाचे १२१ व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे व्हिडीओ तपासले असता 8 महिलांची ओळख पटली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Ravindra Erande Case : एकीकडे नाशिकमधील वासनांध भोंदू अशोक खरात याच्या महिला लैगिंक शोषण प्रकरणाने देशात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच त्याची पुनरावृत्ती शहरातील सातपूर येथे उघडकीस आली आहे. तथाकथित पत्रकार असलेल्या रवींद्र एरंडेच्या टॅब व हार्डडिस्कमधून महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे तब्बल १२१ व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.

रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 4 मोबाईल फोन जप्त केले असून, त्यातील 'डाटा' रिकव्हर करण्याचे काम सुरु आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी आठ पीडितांची ओळख पटविल्याने एरंडे विरोधात तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एरंडेची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यास सोमवारी (दि. ६) न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

रवींद्र गणपत एरंडे याच्या शहरातील अशोक नगर भागात असलेल्या कार्यालयाची शनिवारी रात्री पोलिसांनी झडती घेतली होती. 'न्यायवैधक'च्या पथकाने एरंडेच्या कार्यालयातून तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. तसेच, त्याच्या टॅब व हार्डडिस्कमधून पोलिसांच्या हाती लागलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ तपासून पाहिले जात आहेत. पोलिसांनीही यातील काही महिलांची ओळख पटविली असली तर यातील काही महिलांशी पोलिसांचा अद्याप संपर्क झालेला नाही. पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातून 4 मोबाईल, 2 पेनड्राइव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे.

पीडित महिलांना पोलिसांकडून विश्वासात घेतले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एरंडे याच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पीडित महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. मुलाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याने महिलेवर अत्याचार केले. तीचे छुप्या रितीने व्हिडीओ काढले. याच पद्दतीने तो महिलांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

या प्रकरणात आज सुनावणी होणार असून एरंडे याने आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे आणि या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, हे शोधण्यासाठी पोलीस त्याची कोठडी वाढवून मिळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT