Nashik News : अवैध सावकारीसह खंडणी वसूल करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचा संघटक संशयित विशाल कदम यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली असून तो आधीच कारागृहात आहे. असे असताना त्याच्यावर सावकारीचे आणखी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एका गुन्ह्यात त्याच्या आईचाही समावेश निष्पन्न झाला आहे. कदमसह त्याच्या आईविरुद्धही गुन्ह्याची नोंद असून, त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. तर कदम सध्या आडगाव पोलिसांच्या ताब्यात असून म्हसरुळ पोलिस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
पहिला गुन्हा - म्हसरूळ पोलिस ठाण्यात सुशीला पंडितराव मोरे (रा. म्हसरुळ, वय ६८ ) या पीडितेने फिर्याद दिली आहे. सुशीला मोरे यांनी सन २००७ ते मध्ये संशयित कदमकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या पोटी कदमने त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये वसूल केले. पण त्यानंतरही कदमसह त्याची आई व इतर संशयितांनी अतिरिक्त व्याज मागितले. पैसे देण्याचा तगादा लावला. पीडितेच्या फ्लॅटवर कर्ज काढून व्याज वसूल केले. यासह पीडितेच्या मुलीच्या नावे असलेलाही फ्लॅट बळकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे.
दुसरा गुन्हा- मोतीवाला कॉलेज समोर राहणाऱ्या संजय धोंडू पाटील (वय ४९) यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचे बंधू अरुण यांनी ५ ऑगस्ट २०१५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कदमकडून दरमहा १० टक्के व्याजाने पंचवीस लाख रुपये घेतले होते. व्याजासह रक्कम परत करूनही सहा महिन्यांचे व्याज अधिक असे दहा लाख वसूल केले. पाटील बंधूसह त्यांच्या आईंच्या नावे असलेल्या मालमत्ता बळकावल्या असून, खंडणी स्वरूपात मालमत्ता हडप केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (Nashik News)
विशाल कदमचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. त्याच्याविरोधात पहिला गुन्हा आडगाव पोलिसात सारिका शिरोडे यांच्या फिर्यादीनुसार दाखल झाला आहे. शिरोडे यांच्या पतीचे अपहरण कदम व त्याच्या साथीदारांनी केले होते व सारिका यांना धमकी देत खंडणी मागितली. यात कदम, त्याचा साथीदार अमित मधुकर पाटील यांना अटक केली असून, सिद्धेश्वर अंडे, शंकर वाडेकर हे पसार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.